श्रावण महिना सुरू झाला आहे. जर तुम्हीही श्रावणात उपवास करत असाल तर अनेक ठिकाणी उपवास सोडताना गोड पदार्थ नैवैद्यासाठी दाखवण्याची परंपरा आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण या झटपट होणाऱ्या गोड पदार्थांच्या रेसिपी बद्दल जाणून घेऊयात…
साबुदाणा खीर
श्रावण सोमवारच्या नैवेद्यासाठी, तुम्ही झटपट आणि पौष्टिक अशी पारंपरिक साबुदाणा खीर बनवू शकता.
- साबुदाणा 2-3 तास पाण्यात भिजत ठेवा.
- एका जाड पातेल्यात दूध गरम करा.
- दूध गरम झाल्यावर त्यात भिजवलेला साबुदाणा टाका आणि मंद आचेवर शिजवा.
- दूध आटायला लागले की त्यात साखर टाका आणि मिक्स करा.
- नंतर त्यात काजू, बदाम, मनुके आणि वेलची पूड टाका.
- शेवटी, केशरचे दूध आणि तूप घालून मिक्स करा.
- गरमागरम खीर नैवेद्यासाठी तयार आहे.
मखाण्याची मलाईदार खीर
श्रावण सोमवारच्या नैवेद्यासाठी तुम्ही मखाण्याची मलाईदार खीर बनवू शकता. ही खीर बनवायला सोपी आहे आणि चविष्ट लागते.
- एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मखाना मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
- भाजलेले मखाना मिक्सरमध्ये थोडं जाडसर वाटून घ्या.
- एका पातेल्यात दूध गरम करा.
- दूध गरम झाल्यावर त्यात वाटलेले मखाना, साखर, सुका मेवा, वेलची पूड आणि जायफळ पूड टाका.
- मध्यम आचेवर खीर घट्ट होईपर्यंत शिजवा.
- गरमागरम खीर नैवेद्यासाठी तयार आहे.
ओल्या नारळाची वडी
श्रावण सोमवारच्या नैवेद्यासाठी ओल्या नारळाची वडी एक उत्तम पर्याय आहे.
- एका जाड पातेल्यात तूप गरम करून त्यात नारळाचा चव थोडा परतून घ्या.
- नंतर त्यात साखर घालून मिक्स करा आणि मंद आचेवर सतत ढवळत राहा.
- साखर पूर्णपणे विरघळून मिश्रण घट्ट होऊ लागेल.
- वेलची पूड घालून मिक्स करा.
- एका ताटलीला तूप लावून त्यात हे मिश्रण पसरवून घ्या.
- थंड झाल्यावर वड्या कापून घ्या.
बेसन लाडू
श्रावण सोमवारच्या नैवेद्यासाठी बेसन लाडू एक उत्तम पर्याय आहे.
- प्रथम, बेसन पीठ मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
- भाजलेले पीठ एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात पिठी साखर, वेलची पूड आणि तूप घालून चांगले मिक्स करा.
- मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचे लाडू वळा.
- लाडू वळताना, त्यावर काजू, बदाम लावा.
- नैवेद्यासाठी बेसन लाडू तयार आहेत.
गुलाबजाम
- एका भांड्यात खवा घ्या आणि तो हाताने मऊ करून घ्या.
- त्यामध्ये मैदा, बेकिंग सोडा आणि पिठी साखर मिक्स करा.
- आवश्यकतेनुसार दूध घालून पीठ मळून घ्या. पीठ जास्त कडक किंवा पातळ नसावे.
- पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करा.
- कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात गोळे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
- एका पातेल्यात साखर आणि पाणी घेऊन एकतारी पाक तयार करा.
- पाकात वेलची पूड टाका.
- तळलेले गोळे गरम पाकात टाका आणि १०-१५ मिनिटे भिजवून घ्या.
- वरुन बदामाचे किंवा पिस्त्याचे काप टाकून सजवा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





