हिंदू धर्मात मंगळा गौरी व्रताचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात पाळला जाणारा हा एक पवित्र व्रत मानला जातो. श्रावण महिना 25 जुलै, 2025 पासून सुरू झाला आहे, आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळा गौरी व्रत पाळले जाते. या दिवशी देवी पार्वतीची पूजा केली जाते. आज आपण जाणून घेऊयात मंगळागौरीचे व्रत कसे करायचे..
कशी साजरी करतात मंगळागौर
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व असते. हा महिना खूप पवित्र मानला जातो. या महिन्यात दर मंगळवारी मंगळगौर साजरी केली जाते. यावेळी पूजनाचा घाट घातला जातो. मंगळागौरीची नवविवाहित महिलांमध्ये वेगळीच क्रेझ असते. नवीन लग्न झाल्यानंतर 5 वर्ष ही मंगळगौर खेळण्याची प्रथा असते. मंगळागौरीच्या दिवशी सार्या महिला एकत्र जमतात आणि रात्र जागवतात. रात्र जागवून खेळ खेळण्याची प्रथा असते.
व्रत करण्याची पद्धत
- श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी हे व्रत करतात.
- नववधू आणि इतर स्त्रिया एकत्रितपणे हे व्रत करतात.
- एक चौरंग किंवा पाटावर केळीचे पान ठेवून त्यावर मंगळागौरीची (पार्वती मातेची) मूर्ती किंवा फोटो ठेवावा.
- कलश स्थापन करून त्यावर वस्त्र, हळद-कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा अर्पण कराव्यात.
- मंगळागौरीला सोळा प्रकारची पत्री (पाने) वाहिली जातात.
- सौभाग्याचे साहित्य (बांगड्या, टिकली, इत्यादी) आणि नैवेद्य दाखवावा.
- या व्रतात गौरीला विविध प्रकारची पत्री वाहिली जातात, जसे की जाई, केवडा, दुर्वा, बेल, शमी, अशोक, आघाडा, डाळिंब, मदार, माका, विष्णुक्रांता, पिंपळ, कडुलिंब, इत्यादी.
पूजन
- गणपती आणि मंगळागौरीची आरती करावी.
- मंगळागौरीची कथा वाचावी किंवा ऐकावी.
- यानंतर, स्त्रिया पारंपरिक खेळ खेळतात, जसे की ‘कवळा’, ‘नखोल्या’, ‘ताक’, ‘सोमू-गोमू’ आणि ‘खेळ’.
उद्यापन
- व्रत समाप्तीच्या दिवशी, म्हणजेच पाचव्या मंगळवारी, उद्यापन केले जाते.
- या दिवशी, व्रताचे साहित्य, नवीन वस्त्रे, आणि अलंकार दान केले जातात.
- नववधू आणि इतर स्त्रिया एकत्रितपणे भोजन करतात आणि आनंद साजरा करतात.
व्रताचे महत्व
मंगळागौरीचे व्रत हे पती-पत्नीच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी महत्वाचे मानले जाते. या व्रताने स्त्रियांचे सौभाग्य वाढते, असे मानले जाते. या व्रताच्या माध्यमातून स्त्रिया देवीचा आशीर्वाद घेतात आणि कुटुंबासाठी चांगले आयुष्य मिळावे यासाठी प्रार्थना करतात. श्रावण महिन्यात मंगळागौरीचे व्रत केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आनंद येतो.
मंगळागौरीची पूजा कशी करतात?
- या दिवशी नवविवाहित स्त्रिया सकाळी स्नान करून, सोवळे नेसून पूजेला बसतात.
- सर्वप्रथम विघ्नहर्ता गणेशाची पूजा करावी.
- त्यानंतर लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करून त्याशेजारी महादेवीची पिंड ठेवावी.
- नंतर कणकेच्या दिव्यांची आरास सजवावी.
- देवीला विविध झाडांची पाने, फुलं वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी.
- मंगळागौरीची कहाणी वाचावी.
- नैवैद्य अर्पण करावा.
- दिव्यांनी आरती करावी.
- महिलांना पूजेसाठी आमंत्रित करून हळदी-कुंकू द्यावं.
- रात्रभर जागरण करावे.
खेळ खेळण्याची प्रथा
मंगळागौर पूजनावेळी आपले नातेमंडळी शेजारी आजूबाजूच्या ओळखीतील स्त्रीया व मुलांना बोलावले जाते. त्यानंतर पूजा करून फुगडी व बसफुगडी आणि झिम्मा असे विविध पारंपारिक खेळ खेळून रात्र जागवली जाते असे म्हणतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





