हिंदू धर्मात मंगळा गौरी व्रताचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात पाळला जाणारा हा एक पवित्र व्रत मानला जातो. श्रावण महिना 25 जुलै, 2025 पासून सुरू होत आहे, आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळा गौरी व्रत पाळले जाते. या दिवशी देवी पार्वतीची पूजा केली जाते. यावर्षी मंगळा गौरी व्रत कधी सुरू होईल ते जाणून घेऊया….
श्रावणातील पहिली मंगळागौर कधी केली जाणार?
श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते. श्रावण महिना 25 जुलै 2025 पासून सुरू होत आहे आणि मंगळागौरीचे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी केले जाते. यावर्षी पहिली मंगळागौर 29 जुलै 2025 रोजी असेल.
मंगळागौरी व्रताचे महत्त्व
मंगळागौरी व्रत, श्रावण महिन्यात नवविवाहित महिलांसाठी खूप महत्वाचे आहे. हे व्रत गौरी (पार्वती) देवीला समर्पित आहे आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी ठेवले जाते. नवविवाहित महिलांसाठी हे व्रत महत्त्वाचे आहे. त्या माहेरी जाऊन हे व्रत करतात आणि गौरी देवीची पूजा करतात. मंगळागौरीचे व्रत हे विवाहित महिलांसाठी खूप महत्वाचे मानले जाते. स्त्रिया हे व्रत आपल्या पतीला आणि घराला सुख-समृद्धी लाभावी यासाठी करतात. तसेच, या व्रताने स्त्रियांचे आरोग्य चांगले राहते, आणि घरात सुख-शांती नांदते
मंगळागौरी व्रताची कथा
एकेकाळी, एका नगरीत एक व्यापारी राहत होता. त्याला अपार संपत्ती आणि गुरंढोरं होती, पण त्याला मुलगा नसल्यामुळे तो नेहमी दुःखी असे. एकदा श्रावण महिना आला. श्रावणातले मंगळवार हे देवी पार्वतीला (मंगळागौरीला) समर्पित असतात. त्यामुळे, त्या व्यापाऱ्याने ठरवले की तो मंगळागौरीचे व्रत मनोभावे करील. त्याने दर मंगळवारी उपवास केला आणि देवीची पूजा केली.
त्याच्या भक्तीने देवी प्रसन्न झाली आणि त्याला दर्शन दिले. देवीने त्याला वर मागण्यास सांगितले. व्यापाऱ्याने देवीला सांगितले की, “माझ्याकडे सर्व काही आहे, पण मुलगा नाही, त्यामुळे मी खूप दुःखी आहे.” देवीने त्याला सांगितले, “तुझ्या घरी लवकरच पुत्रजन्म होईल, आणि त्याचे नाव ‘अमर’ ठेव.” देवीच्या कृपेने, व्यापाऱ्याला पुत्र झाला आणि त्याचे नाव ‘अमर’ ठेवण्यात आले.
मंगळागौरी व्रताची पूजा विधी
मंगळागौरी व्रताच्या पूजेसाठी, प्रथम घरासमोर रांगोळी काढावी आणि दाराला तोरण बांधावे. त्यानंतर, चौरंग मांडून त्यावर केळीचे पाने ठेवावी. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर गौरीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. पूजेसाठी आवश्यक असणारे साहित्य जसे की, फुले, दुर्वा, अक्षता, हळद, कुंकू, वस्त्र, बांगड्या, इत्यादी साहित्य गौरीला अर्पण करावे. पूजेमध्ये मंगळागौरीची कथा वाचावी किंवा ऐकावी. आरती म्हणावी आणि नैवेद्य दाखवावा.
- घराला आणि विशेषतः पूजेच्या ठिकाणी स्वच्छता करावी.
- चौरंगावर केळीची पाने ठेवून त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा.
- कलशावर गौरीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा.
- सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी, त्यानंतर गौरीची पूजा करावी.
- गौरीला प्रार्थना करून मंत्र म्हणावे.
- मंगळागौरीची कथा वाचावी किंवा ऐकावी.
- गौरीची आरती म्हणावी.
- गौरीला नैवेद्य दाखवावा.
- गौरीला प्रदक्षिणा घालावी.
- गौरीचा आशीर्वाद घ्यावा.
- पूजेनंतर महिलांनी एकत्र बसून फराळ करावा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





