MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

Shravan 2025 : यंदा मंगळागौर कधी साजरी करता येईल, तारखांची यादी…

Published:
श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे.
Shravan 2025 : यंदा मंगळागौर कधी साजरी करता येईल, तारखांची यादी…

यंदा, मंगळागौर श्रावण महिन्यात साजरी केली जाईल, श्रावण आज पासून म्हणजेच 25 जुलै 2025 पासून सुरू होत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौर व्रत केले जाते. या दिवसांमध्ये, विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगळागौरीची पूजा करतात. अविवाहित मुली चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत करतात. यंदा श्रावणातील मंगळागौरी तिथी अतिशय खास असणार आहे. कारण श्रावणातील 4 मंगळवारी विशेष सण असणार आहे. जाणून घेऊयात…

मंगळागौरीचे महत्त्व

मंगळागौर श्रावण महिन्यात येणार आहे आणि त्यातील प्रत्येक मंगळवारी तुम्ही मंगळागौरीचे पूजन करू शकता. यावर्षी श्रावणातील पहिली मंगळागौर 29 जुलै, 2025 ला आहे. मंगळागौर हे व्रत स्त्रिया विशेषतः नवविवाहित महिलांसाठी महत्वाचे मानले जाते. हे व्रत श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी केले जाते. या व्रतात देवी पार्वतीची (गौरी) पूजा केली जाते. या व्रताचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात. अविवाहित मुली चांगले पती मिळावे यासाठी हे व्रत करतात.

तारखांची यादी

श्रावण महिना आज पासून म्हणजेच 25 जुलै 2025 पासून त्यामुळे, पहिल्या मंगळागौरीची तारीख 29 जुलै, 2025 असेल.

  • पहिली मंगळागौर : 29 जुलै, 2025
  • दुसरी मंगळागौर : 5 ऑगस्ट, 2025
  • तिसरी मंगळागौर : 12 ऑगस्ट, 2025
  • चौथी मंगळागौर : 19 ऑगस्ट, 2025

श्रावणातील 4 मंगळवारी विशेष सण असणार आहे

  • पहिला मंगळवार – 29 जुलै 2025 – नागपंचमी
  • दुसरा मंगळवार – 5 ऑगस्ट 2025 – पुत्रदा एकादशी
  • तिसरा मंगळवार – 12 ऑगस्ट 2025 – अंगारक संकष्ट चतुर्थी
  • चौथा मंगळवार – 19 ऑगस्ट 2025 – अजा एकादशी

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)