MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

Nag Panchami 2025 : नागपंचमीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा…

Published:
श्रावणमासातील पहिला सण नागपंचमीचा! या निमित्त आपल्या प्रियजनांना द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा...
Nag Panchami 2025 :  नागपंचमीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या खास मराठमोठ्या शुभेच्छा…

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्वाचा सण आहे. या दिवशी नागांची पूजा केली जाते, पुराणांनुसार, नाग हे देवांचे रक्षक आणि निसर्गाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे, नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. नागपंचमीनिमित्त मराठमोळ्या शुभेच्छा शेअर करून श्रावणातील पहिला सण साजरा करा…

यंदा नागपंचमीचा सण कधी?

पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीची तिथी 28 जुलैला रात्री 11 वाजून 23 मिनिटांनी सुरु होते. तसेच 29 जुलैला रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार नागपंचमी हा सण 29 जुलैला साजला केला जाईल.

नागपंचमीचे महत्त्व

नागपंचमीच्या दिवशी महिला वारुळात दूध आणि लाह्या अर्पण करून नागदेवाची पूजा करतात. नागदेवाची पूजा केल्याने सापांविषयीची भिती दूर होते असे मानले जाते. नागपंचमीला नागांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव केला, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो, असे मानले जाते. तसेच ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्प दोष असतो त्यांनीही या दिवशी काही विशेष उपाय केल्यास त्यांच्या कुडलीतील दोष दूर होतो अशीही मान्यता आहे.

नागपंचमीच्या शुभेच्छा…

मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागपंममीचा सण आला,
पर्जन्यराजाला आनंद झाला
न्हाहून निघाली वसुधंरा,
घेतला हाती हिरवा शेला…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
सण आला नागपंचमीचा,
मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा,
हिच आमची सदिच्छा
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
बळीराजाचा कैवारी
पूजा त्याची होते घरोघरी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नागपंचमीचा दिवस तुमच्यासाठी मंगलमय असावा
हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करू यान
नागपंचमीच्या दिवशी निसर्गाचे जतन करू या
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)