स्वप्नशास्त्र नुसार, प्रत्येक स्वप्नं हे कोणत्या ना कोणत्या येणाऱ्या घटनेकडे निर्देश करते. त्यापैकीच एक सामान्य पण रहस्यमय स्वप्नांपैकी एक म्हणजे स्वप्नात साप दिसणे. स्वप्नात साप दिसणे हे शुभ आणि अशुभ दोन्ही संकेत देऊ शकते. सापाचे स्वप्न पडल्यास, त्याचा अर्थ तुमच्या जीवनातील परिस्थिती आणि स्वप्नातील सापाच्या स्थितीवर अवलंबून असतो.
शिवलिंग किंवा भगवान शंकारभोवती गुंडाळलेला साप
स्वप्नात शिवलिंग किंवा भगवान शंकराभोवती गुंडाळलेला साप दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि लवकरच तुमच्या कार्यात यश मिळेल. साप आणि शिवलिंग हे स्वप्न संरक्षण आणि शक्तीचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या जीवनातील आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाल.
फणा काढलेला साप दिसणं
स्वप्नात फणा काढलेला साप दिसणे हे सामान्यतः शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे किंवा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहेत. फणा काढलेला साप स्वप्नात दिसणे म्हणजे देवी-देवतांची कृपा तुमच्यावर आहे आणि तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. हे स्वप्न आर्थिक लाभाचे देखील संकेत देते. तुमच्या कामात यश मिळून धनसंपत्ती वाढण्याची शक्यता आहे.
पांढरा साप
स्वप्नात पांढरा साप दिसणे हे सामान्यतः शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणि समृद्धी येणार आहे. पांढरा साप संपत्ती आणि नशिबाचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे स्वप्नात पांढरा साप दिसल्यास लवकरच धनलाभ होण्याची शक्यता असते. पांढरा रंग शुद्धता आणि बदलांचे प्रतीक आहे. त्यामुळे, स्वप्नात पांढरा साप दिसणे आध्यात्मिक जागृती किंवा आत्म-शोध दर्शवू शकते. स्वप्नात पांढरा साप दिसणे म्हणजे शिवाची कृपा असणे.
काळा साप
स्वप्नात काळा साप दिसणे हे करिअरमध्ये प्रगती, नोकरीत बढती आणि बिघडलेली कामे सुरळीत होण्याचे लक्षण असू शकते, असे स्वप्नशास्त्र सांगते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)






