Nagpanchami Special Recipe : खुसखुशीत पारंपरिक तिळाच्या करंज्या यंदाच्या नागपंचमीला बनवून बघाच…

Published:
नागपंचमीच्या सणाला गोडधोड पदार्थांमध्ये करा तिळाच्या चविष्ट करंज्या, पहा खास रेसिपी..
Nagpanchami Special Recipe :  खुसखुशीत पारंपरिक तिळाच्या करंज्या यंदाच्या नागपंचमीला बनवून बघाच…

नागपंचमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव 29 जुलै 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. नागपंचमीच्या सणाला पारंपरिक पदार्थ म्हणून तिळाच्या करंज्या बनवतात. या दिवसासाठी खास आणि चविष्ट असा हा पदार्थ आहे. तिळाच्या करंज्या कशा बनवायच्या याची परफेक्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत….

साहित्य

वरील भागासाठी

  • मैदा
  • गरम पाणी
  • मीठ
  • तेल

सारणासाठी

  • पांढरे तीळ
  • गूळ
  • किसलेले खोबरे
  • वेलची पूड
  • पिठी साखर
  • तूप

कृती

वरील भागासाठी

  • मैदा, मीठ आणि गरम पाणी मिक्स करून पीठ मळून घ्या.
  • 15-20 मिनिटे बाजूला ठेवा.

सारणासाठी

  • तीळ भाजून घ्या.
  • गूळ, खोबरे, वेलची पूड आणि पिठी साखर मिक्स करा.
  • भाजलेले तीळ मिक्स करा.

करंज्या बनवण्यासाठी

  • पिठाचे छोटे गोळे करून, पुरीसारखे लाटून घ्या.
  • लाटलेल्या पुरीमध्ये सारण भरून, करंजीचा आकार द्या.
  • गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. 

टीप

करंज्या तळताना मध्यम आचेवर तळा.
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews