Narali Pournima Special Recipe : नारळी पौर्णिमा स्पेशल स्वादिष्ट सुवासिक नारळी भात पाहा ही सोपी रेसिपी

Published:
नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळी भात पहिले डोळ्यांसमोर येतो. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने हा भात बनवू शकता. जाणून घ्या ही रेसिपी.
Narali Pournima Special Recipe : नारळी पौर्णिमा स्पेशल स्वादिष्ट सुवासिक नारळी भात पाहा ही सोपी रेसिपी

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केले जातात. नारळी पौर्णिमा म्हटले की आठवतो नारळी भात. तुम्ही नारळी पौर्णिमा असो किंवा रक्षाबंधन दोन्हीसाठी घरी गोड पदार्थ म्हणून नारळी भात बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया नारळी भाताची ही सोपी रेसिपी.

साहित्य

  • 1 वाटी बासमती तांदूळ
  • 2 वाट्या नारळाचे दूध
  • 1 वाटी किसलेला नारळ
  • 1 वाटी गूळ
  • वेलची, दालचिनी, लवंग (आवडीनुसार)
  • 2 चमचे तूप
  • काजू, बदाम (आवडीनुसार)

कृती

  • तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या.
  • नारळाचे दूध गरम करून त्यात गूळ विरघळवून घ्या.
  • एका भांड्यात तूप गरम करून त्यात वेलची, दालचिनी, लवंग टाका.
  • नंतर त्यात तांदूळ आणि किसलेला नारळ घालून चांगले परतून घ्या.
  • गरम केलेले नारळाचे दूध आणि गूळ यांचे मिश्रण तांदुळात टाका
  • मंद आचेवर 15-20 मिनिटे शिजवून घ्या.
  • पाणी पूर्णपणे आटल्यावर गॅस बंद करा.
  • गरमागरम नारळी भात काजू, बदाम घालून सर्व्ह करा. 

टीप

  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ आणि नारळाच्या चवीचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
  • नारळाच्या ऐवजी तुम्ही खजूर किंवा मनुका देखील वापरू शकता.
  • नारळी भात गरम असतानाच खायला खूप छान लागतो. 
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews