Raksha Bandhan 2025 : नारळाचं आईस्क्रीम असा करा नारळी पौर्णिमेचा खास बेत, पाहा ही सोपी रेसिपी

Published:
नारळी पौर्णिमेसाठी नारळाचं आईस्क्रीम हा एक खास आणि थंडगार बेत आहे. नारळाच्या दुधाचा आणि मलईचा वापर करून हे आईस्क्रीम घरीच सहज बनवता येते.
Raksha Bandhan 2025 : नारळाचं आईस्क्रीम असा करा नारळी पौर्णिमेचा खास बेत, पाहा ही सोपी रेसिपी

भाऊ आणि बहिणींच्या नात्याचे महत्व सांगणारा एक पवित्र सण आहे, जो दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा सण 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. आज आम्ही तुम्हाला रक्षाबंधनानिमित्त घरच्या घरी बनवू शकता असा गोड पदार्थ सांगणार आहोत. जो तु्म्ही सहज तयार करु शकता, चला जाणून घ्या सोपी रेसिपी….

नारळाचं आईस्क्रीम

साहित्य

  • नारळाचं दूध
  • शहाळ्याची मलई 
  • साखर
  • व्हिप्ड क्रीम
  • व्हॅनिला इसेन्स
  • बारीक चिरलेला सुका मेवा सजावटीसाठी 

कृती

  • एका भांड्यात नारळाचं दूध, शहाळ्याची मलई आणि साखर घालून चांगले मिक्स करा.
  • साखर पूर्णपणे विरघळल्यावर त्यात व्हिप्ड क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स घालून चांगले फेटून घ्या.
  • मिश्रण एका हवाबंद डब्यात घालून फ्रीजरमध्ये 4-5 तास किंवा सेट होईपर्यंत ठेवा.
  • आईस्क्रीम सेट झाल्यावर बाहेर काढून 5-10 मिनिटे ठेवा.
  • वरुन सुका मेवा घालून, नारळी पौर्णिमेचा आनंद घ्या!

टीप

  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार नारळ, पिस्ता, बदाम किंवा इतर सुका मेवा वापरू शकता.
  • जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल, तर साखरेचे प्रमाण वाढवू शकता.
  • फ्रीजरमधून काढल्यावर लगेच न खाता थोडे वितळल्यावर खाल्ले तर चव अधिक चांगली लागते.