Raksha Bandhan Special Recipe : राखी पौर्णिमेला बनवा नारळापासून नारळाच्या वड्या, जाणून घ्या सोपी रेसिपी

Published:
पांढऱ्याशुभ्र, खुटखुटीत आणि सर्वांना आवडतील अशा नारळाच्या वड्या बनवण्यासाठी, ही सोपी आणि परफेक्ट रेसिपी जाणून घ्या
Raksha Bandhan Special Recipe : राखी पौर्णिमेला बनवा नारळापासून नारळाच्या वड्या, जाणून घ्या सोपी रेसिपी

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केले जातात. आज आम्ही तुम्हाला रक्षाबंधनानिमित्त घरच्या घरी बनवू शकता असा गोड पदार्थ सांगणार आहोत. जो तु्म्ही सहज तयार करु शकता, चला जाणून घ्या सोपी रेसिपी…

नारळाच्या वड्या

साहित्य

  • एक वाटी किसलेले ओले खोबरे 
  • एक वाटी साखर 
  • अर्धा कप दूध
  • 2 चमचे तूप 
  • वेलची पूड 
  • पिस्ता किंवा बदामाचे काप 

कृती

  • एका जाड पातेल्यात तूप गरम करून त्यात किसलेले खोबरे टाका आणि मंद आचेवर 2-3 मिनिटे भाजून घ्या.
  • आता त्यात साखर आणि दूध टाका. मिश्रण सतत ढवळत राहा, जेणेकरून ते खाली लागणार नाही.
  • मिश्रण घट्ट झाल्यावर आणि त्याला वडीच्या पिठासारखा आकार येऊ लागल्यावर गॅस बंद करा.
  • त्यात वेलची पूड आणि आवडीनुसार पिस्ता किंवा बदामाचे काप टाका.
  • एका पसरट ताटलीला तूप लावून मिश्रण त्यात पसरवून घ्या.
  • मिश्रण थोडे थंड झाल्यावर वड्या कापून घ्या.
  • वड्या पूर्णपणे थंड झाल्यावर, त्यांना डब्यात भरून ठेवा. 

टीप

  • नारळाच्या वड्या करताना गॅस मंद आचेवर ठेवावा, नाहीतर त्या करपण्याची शक्यता असते.
  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
  • तुम्ही यात केसर किंवा जायफळ देखील घालू शकता.
  • गरमागरम वड्या खायला खूप छान लागतात, पण थंड झाल्यावर त्यांची चव आणखीनच छान लागते.