Narali Pournima Special Recipe : नारळी पौर्णिमा स्पेशल, नैवेद्यासाठी बनवा नारळाची परफेक्ट खीर

Published:
यंदा नारळी पौर्णिमेला काहीतरी विशेष करावं असं मनात असेल तर त्यासाठी आहेत ओल्या नारळाच्या या विशेष मिठाया. करायला अगदीच सोप्या.
Narali Pournima Special Recipe : नारळी पौर्णिमा स्पेशल, नैवेद्यासाठी बनवा नारळाची परफेक्ट खीर

तुम्ही नारळी पौर्णिमा असो किंवा रक्षाबंधन दोन्हीसाठी घरी गोड पदार्थ म्हणून नारळापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. सणावाराच्या निमित्तानं, आपण गोडाधोडाचे पदार्थ बनवत असतो त्यासाठी खास नारळाची खीर कशी बनवायची याची परफेक्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत…चला तर मग जाणून घेऊया…

साहित्य

  • एक कप ओल्या नारळाचा खव 
  • दोन कप दूध 
  • अर्धा कप साखर 
  • एक चमचा वेलची पूड 
  • काजू किंवा बदाम  

कृती

  • एका पातेल्यात दूध गरम करा.
  • दूध गरम झाल्यावर त्यात नारळ आणि साखर टाका.
  • मध्यम आचेवर 10-15 मिनिटे शिजवा.
  • दूध थोडे आटल्यावर त्यात वेलची पूड टाका.
  • गरमागरम किंवा थंडगार नारळाची खीर काजू किंवा बदामांनी सजवून सर्व्ह करा. 

टीप

  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर आणि ड्रायफ्रुट्सचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
  • तुम्ही खीर थोडी पातळ किंवा घट्ट करण्यासाठी दूधाचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
  • नारळाच्या खिरीला आणखीन छान चव येण्यासाठी तुम्ही त्यात थोडंसं केशर देखील टाकू शकता. 
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews