Marathi News

Raksha Bandhan 2025 : 8 की 9 ऑगस्ट यंदा कधी आहे रक्षाबंधन, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Published:
दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरं केलं जातं. याच दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
Raksha Bandhan 2025 : 8 की 9 ऑगस्ट यंदा कधी आहे रक्षाबंधन, जाणून घ्या शुभ मुहूर्त

रक्षाबंधन म्हणजे, बहिण-भावाच्या नात्याचा सण. ज्याला राखीपौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं. संपूर्ण देशभरात हा सण साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणारा रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मातील भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे सर्वात सुंदर प्रतीक आहे. 2025 मध्ये म्हणजेच यंदा हा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल, या सणाची नेमकी तारीख काय आणि त्याच्याशी संबंधित माहिती जाणून घेऊया…

रक्षाबंधन नेमकं कधी? 

हिंदू पंचांगानुसार, यावर्षी श्रावणी पौर्णिमेची तिथी शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 रोजी 02 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल. दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्ट 2025, शनिवारी दुपारी 01 वाजून 24 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार 9 ऑगस्ट 2025, शनिवारी रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला जाईल. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतील.

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय? 

9 ऑगस्ट 2025 रोजी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 5:35 ते दुपारी 1:24 पर्यंत असेल. म्हणजेच, रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त जवळपास 7 तास 49 मिनिटांचा असेल. या दरम्यान तुम्ही कोणत्याही वेळी राखी बांधू शकता. या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी 12:00 ते 12:53 पर्यंत असेल. राखी बांधण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews