Shravan 2025 : भूतानी बांधलेले ‘हे’ शिवमंदिर तुम्हाला माहिती आहे का? भोलेनाथच्या भक्तांची प्रत्येक इच्छा होते पूर्ण

Published:
भारतातील भगवान शिवाला समर्पित अनेक चमत्कारिक मंदिरांचा उल्लेख शास्त्रांमध्ये करण्यात आला आहे. त्यांच्याशी संबंधित अनेक मनोरंजक कथा लोकप्रिय आहेत. भारतात एक शिव मंदिर आहे जे भूतांनी बांधले होते?
Shravan 2025 : भूतानी बांधलेले ‘हे’ शिवमंदिर तुम्हाला माहिती आहे का? भोलेनाथच्या भक्तांची प्रत्येक इच्छा होते पूर्ण

भारतात भगवान शंकर यांचे अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. ज्यांच्याशी अनेक मनोरंजक कथा देखील जोडल्या गेल्या आहेत. हसनपूर परिसरात भगवान शिवाचे एक हजार वर्षांपूर्वीचे मंदिर आहे, ज्याला भूतेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते, असे सांगितले जाते. असे मानले जाते की हे मंदिर एका रात्रीत भूतांनी बांधले होते, त्यामुळे त्याचे नाव भूतेश्वर पडले.

भूतांनी हे मंदिर एका रात्रीत बांधले

स्थानिक लोक म्हणतात की, हे मंदिर भूतांनी एका रात्रीत बांधले होते. परंतु या मंदिराचे शिखर सूर्योदयापर्यंत बांधता आले नाही. भूत ते अपूर्ण ठेवून गायब झाले. यानंतर, मंदिराचे शिखर राजा नैन सिंह यांनी बांधले. श्रावण महिन्यात आणि शिवरात्रीच्या दिवशी देशाच्या अनेक भागांतून शिवभक्त मोठ्या संख्येने भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी आणि हे अनोखे मंदिर पाहण्यासाठी येथे येतात.

हजारो वर्षे जुने मंदिर

हसनपूर परिसरात भगवान शिवाचे एक हजार वर्षांपेक्षा जास्त जुने मंदिर आहे, असे सांगितले जाते. या मंदिराला भूतेश्वर महादेव मंदिर असेही म्हणतात, कारण या मंदिराच्या बांधकामाबाबत एक आख्यायिका आहे की ते एका रात्रीत भूतांनी बांधले होते. हसनपूर (उत्तर प्रदेश) येथे असलेले हे मंदिर ‘भूतों का मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. स्थानिक लोकांमध्ये या मंदिराची खूप श्रद्धा आहे. 

मंदिराचे महत्त्व

हे मंदिर हजारो वर्षांपासून आहे आणि या मंदिराला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. मंदिराचे महंत महाराज गिरी यांच्या मते, हे मंदिर खूप जुने आहे. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे आणि याला हजारो वर्षांची परंपरा आहे. या मंदिराबद्दल एक आख्यायिका आहे की ते भूतांनी बांधले आहे, ज्यामुळे ते अधिक आकर्षक आणि रहस्यमय बनते. श्रावण महिन्यात या मंदिराला विशेष महत्त्व असते आणि या महिन्यात येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होते. असे मानले जाते की या मंदिरात श्रद्धापूर्वक प्रार्थना केल्यास इच्छा पूर्ण होतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews