श्रावण महिना हा भगवान भोलेनाथाला समर्पित आहे. असं म्हणतात श्रावणातील सोमवारी उपवास केल्याने मनोकामना पूर्ण होतात. आणि उपवास म्हटला की घराघरात उपवासांच्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. श्रावणातल्या उपवासात विविध पदार्थ खाल्ले जाऊ शकतात, तुम्ही उपवासाला साबुदाणा न वापरता उपवासाचा बटाटावडा नक्कीच बनवू शकता. त्याची चव केवळ अप्रतिमच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. जाणून घेऊया….
साहित्य
- उकडलेले बटाटे: ४-५ (मध्यम आकाराचे)
- शेंगदाणे: १/२ कप (भाजलेले आणि जाडसर वाटलेले)
- हिरवी मिरची: २-३ (बारीक चिरलेली) किंवा मिरचीचा ठेचा
- जिरे: १ चमचा
- मीठ: चवीनुसार
- शेंगदाणा तेल: तळण्यासाठी
कृती
- बटाटे उकडवून घ्या आणि गरम असतानाच स्मॅश करून घ्या.
- स्मॅश केलेल्या बटाट्यात शेंगदाणा कूट, मिरची, जिरे, मीठ आणि आवश्यक असल्यास इतर उपवासाचे साहित्य मिक्स करा.
- मिश्रणाचे लहान-लहान वडे तयार करा.
- कढईत तेल गरम करून वडे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
टीप
- तुम्ही वड्यांना आणखी कुरकुरीत करण्यासाठी, पिठाच्या जाडसर आवरणाऐवजी, भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ किंवा राजगिरा पीठ मिक्स करू शकता.
- तेल गरम झाल्यावरच वडे टाका.
- वडे तळताना गॅस मध्यम ठेवा.
- गरमागरम वडे दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.






