Shravan Recipe : उपवासाला घरी बनवा चविष्ट आणि कुरकुरीत बटाटा- रताळ्याचे काप

Published:
आज आम्ही ज्या रेसिपी बद्दल सांगणार आहोत, त्याची चव केवळ अप्रतिमच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. चला पाहुयात बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप कशी बनवायची.
Shravan Recipe : उपवासाला घरी बनवा चविष्ट आणि कुरकुरीत बटाटा- रताळ्याचे काप

श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना व्रत-वैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात तुम्हीही उपवास करत असाल तर आणि तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आजची ही हटके रेसिपी एकदा नक्की करून पहा…

साहित्य

  • बटाटे – 2
  • रताळी – पाव किलो
  • मीठ – चवीनुसार
  • तिखट – 1 चमचा
  • पिठीसाखर – 1 चमचा
  • राजगिरा पीठ – 1 वाटी
  • तेल – अर्धी वाटी
  • लिंबाचा रस – आवडीनुसार

कृती

  • बटाटा-रताळ्याचे काप तयार करण्यासाठी सर्वप्रथम बटाटे आणि रताळे स्वछ पाण्याने धुवून घ्या
  • यानंतर दोन्हींचे गोलाकार असे पातळ काप करून घ्या
  • यानंतर एका ताटात राजगिऱ्याचे पीठ घेऊन त्यात तिखट, मीठ आणि पिठीसाखर घाला आणि मिक्स करा
  • आवडीनुसार तुम्ही यात लिंबाचा रसदेखील घालू शकता
  • आता बटाटा-रताळ्याचे काप यात मिसळून हा मसाला या कापांना छान लावून घ्या
  • त्यानंतर दुसरीकडे गॅसवर तवा ठेवा आणि यात तेल टाका
  • आता तव्यावर एक एक काप टाका आणि मंद आचेवर हे काप छान कुरकुरीत भाजून घ्या
  • हे काप भाजताना गॅसची फ्लेम मंदच असूद्यात
  • दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत भाजून झाल्यानंतर तुमचे काप तयार होतील.
  • तयार काप प्लेटमध्ये काढून खाण्यासाठी सर्व्ह करा.
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews