श्रावण महिना हा भगवान भोलेनाथाला समर्पित आहे. असं म्हणतात श्रावणातील सोमवारी उपवास केल्याने मनोकामना पूर्ण होतात. आणि उपवास म्हटला की घराघरात पदार्थांची रेलचेल सुरू असते. आज आम्ही अशाच एका सोप्या रेसिपी बद्दल सांगणार आहोत, त्याची चव केवळ अप्रतिमच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. जाणून घेऊया….
साहित्य
सारणासाठी
- ओल्या नारळाचे काप
- गूळ
- वेलची पूड
- जायफळ
- तूप
पिठासाठी
- तांदळाचे पीठ
- पाणी
- मीठ
- हळदीची पाने
कृती
सारण तयार करणे
- एका भांड्यात नारळ, गूळ, वेलची पूड आणि जायफळ (आवश्यक असल्यास) घ्या.
- चांगले मिक्स करून घ्या.
- मिश्रण थोडे घट्ट करण्यासाठी थोडेसे तूप घाला.
पिठाचे मिश्रण तयार करणे
- एका भांड्यात तांदळाचे पीठ, मीठ आणि पाणी घ्या.
- पीठ थोडे पातळसर करून घ्या.
पातोळ्या बनवणे
- हळदीचे पान घ्या आणि त्यावर पिठाचे पातळ थर लावा.
- त्यावर सारणाचे मिश्रण पसरवा.
- पानाची गुंडाळी करा.
वाफवणे
- एका भांड्यात पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवा.
- पातोळ्या चाळणीवर ठेवून 10-15 मिनिटे वाफवून घ्या.
- गरमागरम पातोळ्यांचा आस्वाद घ्या
टीप
- हळदीच्या पानांच्या ऐवजी तुम्ही केळीच्या पानांचा देखील वापर करू शकता.
- सारणासाठी तुम्ही गूळ किंवा साखर वापरू शकता.
- पातोळ्या गरम असतानाच खायला छान लागतात.






