Shravan Special Recipe : श्रावण स्पेशल, कांदा आणि लसूण न वापरता मसूरची आमटी नक्की ट्राय करा…

Published:
श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण न वापरता मसूर आमटी बनवण्यासाठी, तुम्ही खोबरे, आले, मिरची आणि टोमॅटो वापरू शकता.
Shravan Special Recipe : श्रावण स्पेशल, कांदा आणि लसूण न वापरता मसूरची आमटी नक्की ट्राय करा…

सध्या श्रावण महिन्यात अनेकजण मोठ्या श्रद्धने उपवास करतात. श्रावण महिन्यात उपवासाचे आणि पारंपरिक पदार्थांना विशेष महत्त्व आहे. आज आपण कांदा-लसूण न वापरता मसूरची आमटी कशी बनवायची हे जाणून घेऊयात…

साहित्य

  • 1 वाटी मसूर डाळ
  • 1/2 वाटी खोबरे (बारीक केलेले)
  • 1 इंच आले (बारीक केलेले)
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • 1/2 टोमॅटो (बारीक चिरलेला)
  • 1/4 चमचा मेथीदाणे
  • 1/2 चमचा मोहरी
  • 1/2 चमचा जिरे
  • 1 चमचा धने पावडर
  • 1/4 चमचा हळद
  • चिंच किंवा आमसूल (आवडीनुसार)
  • 1 चमचा तेल
  • 2-3 कढीपत्ता
  • कोथिंबीर (बारीक चिरलेली)
  • मीठ (चवीनुसार)
  • पाणी 

कृती

  • मसूर डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या.
  • एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, मेथीदाणे आणि जिरे टाका.
  • नंतर कढीपत्ता, आले आणि मिरची घालून परतून घ्या.
  • टोमॅटो घालून चांगले मिक्स करा आणि मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
  • बारीक केलेले खोबरे, धने पावडर आणि हळद घालून मिक्स करा.
  • शििजलेली डाळ, चिंच किंवा आमसूल आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
  • आवश्यकतेनुसार पाणी घालून आमटीला उकळी येऊ द्या.
  • शेवटी, कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
  • गरमागरम मसूर आमटी भात किंवा पोळी सोबत सर्व्ह करा. 
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews