Marathi News

Shravan Special Recipe : उपवासाला बनवा बटाट्याच्या अप्प्यांची सोपी रेसिपी

Published:
श्रावण महिन्यात उपवासाला बटाट्याचे अप्पे नक्कीच खाल्ले जातात! ही एक सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे.
Shravan Special Recipe : उपवासाला बनवा बटाट्याच्या अप्प्यांची सोपी रेसिपी

श्रावण महिना हा भगवान भोलेनाथाला समर्पित आहे. असं म्हणतात श्रावणातील सोमवारी उपवास केल्याने मनोकामना पूर्ण होतात. आणि उपवास म्हटला की घराघरात उपवासांच्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. श्रावणातल्या उपवासात विविध पदार्थ खाल्ले जाऊ शकतात, तुम्ही उपवासाला बटाट्याचे आप्पे नक्कीच बनवू शकता. त्याची चव केवळ अप्रतिमच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. जाणून घेऊया….

साहित्य

  • 2 उकडलेले बटाटे
  • 1/2 वाटी भगर किंवा वरी 
  • 1/4 वाटी शेंगदाणे 
  • 1 चमचा जिरे 
  • 1/2 चमचा लाल तिखट 
  • 1/4 चमचा काळी मिरी पूड 
  • 1/4 चमचा साखर 
  • चवीनुसार मीठ 
  • 2-3 चमचे दही 
  • तेल 

कृती

  • भगर किंवा वरी 15-20 मिनिटे पाण्यात भिजवून घ्या.
  • उकडलेले बटाटे मॅश करून घ्या.
  • शेंगदाणे भाजून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करा.
  • भिजवलेली भगर किंवा वरी मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात, बटाटे, भगर, शेंगदाणा कूट, जिरे, लाल तिखट, काळी मिरी पूड, साखर, मीठ आणि दही मिक्स करा.
  • जर मिश्रण पातळ वाटत असेल, तर थोडेसे भाजके शेंगदाण्याचे कूट किंवा भगरचे पीठ (किंवा साबुदाणा पीठ) घालून घट्ट करा.
  • आप्पेपात्राला तेल लावून गरम करा.
  • मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून अप्पेपात्रात टाका.
  • मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
  • गरम-गरम अप्पे दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा. 

टीप

  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट आणि मिरी पूडचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
  • उपवासाला चालणारे कोणतेही मसाले तुम्ही वापरू शकता.
  • जर तुमच्याकडे आप्पेपात्र नसेल, तर तुम्ही कढईत थोडेसे तेल घालून, छोटे छोटे वडे करून तेही भाजून घेऊ शकता. 
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews