सध्या श्रावण महिन्यात अनेकजण मोठ्या श्रद्धने उपवास करतात. अशात साबुदाणा खिचडी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही उपवासाला वेगळं काही करू शकता. तुम्ही उकळलेले बटाटे, राजगिरा आणि शिंगाडा पीठापासून दहिवडा बनवू शकता. उपवासासाठी हा एक चांगला पर्याय आहे. हा उपवासाचा दहिवडा कसा बनवायचा, यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या…
साहित्य
- उकडलेले बटाटे
- राजगिरा पीठ
- शिंगाडा पीठ
- जिरे पूड
- सेंधा मीठ
- तेल
- दही
- पिठी साखर
- बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
- उकडलेले बटाटे चांगले स्मॅश करून घ्या.
- त्यात राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ, जिरे पूड आणि सेंधा मीठ घालून चांगले मिक्स करा.
- पिठाचा गोळा मऊसर मळून घ्या.
- गोळ्याचे छोटे-छोटे गोळे करून त्यांना हाताने थोडंसं दाबून चपटे करा.
- कढईत तेल गरम करून त्यात हे दहिवडे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
- एका भांड्यात दही आणि पिठी साखर मिक्स करून घ्या.
- तळलेले दहिवडे थोडं थंड झाल्यावर दह्याच्या मिश्रणात बुडवून घ्या.
- 10-15 मिनिटे दह्यात भिजल्यावर दहिवडे प्लेटमध्ये काढून घ्या.
- वरतून थोडी कोथिंबीर आणि जिरे पूड घालून सजवा.
- गरमागरम दहिवडे उपवासासाठी तयार आहेत.
टीप
- दहिवडे तळताना तेल मध्यम आचेवर गरम ठेवा, नाहीतर ते आतून कच्चे राहतील.
- दह्यात भिजवताना दहिवडे पूर्णपणे बुडतील इतके दही घ्या.
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार जिरे पूड, मिरची पूड किंवा इतर मसाले दह्यात घालू शकता.
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..