Shravan Special Recipe : श्रावण स्पेशल, नैवेद्यासाठी बनवा ‘मखाना मलाई खीर’ नक्की करून बघा!

Published:
संध्याकाळी व्रत सोडल्यानंतर काही तरी हलकं-फुलकं, पण गोड आणि पोषणमूल्य असलेलं काही तरी खाण्याची इच्छा होते. अशा वेळी पारंपारिक चव आणि पौष्टिकता लाभलेली ‘मखाना मलाई खीर’ बनवू शकता.
Shravan Special Recipe : श्रावण स्पेशल, नैवेद्यासाठी बनवा ‘मखाना मलाई खीर’ नक्की करून बघा!

श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करतात. यात श्रावणात विशेषत: सोमवार, शनिवारी उपवास करण्याची पद्धत आहे. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात आणि संध्याकाळी व्रत सोडल्यानंतर काही तरी हलकं-फुलकं, पण गोड आणि पोषणमूल्य असलेलं काही तरी खाण्याची इच्छा होते. अशा वेळी पारंपरिक चव आणि पौष्टिकता लाभलेली ‘मखाना मलाई खीर’  बनवू शकता. यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या…

साहित्य

  • १ कप मखाना (कमळ gatta)
  • अर्धा लिटर दूध
  • १/२ कप साखर (आवडीनुसार कमी-जास्त)
  • वेलची पूड
  • थोडे केशर (optional)
  • बारीक चिरलेले बदाम आणि पिस्ता (सजावटीसाठी)
  • तूप 

कृती

  • प्रथम, एका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यात मखाना मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
  • नंतर, त्याच पॅनमध्ये दूध गरम करून त्यात भाजलेले मखाना टाका.
  • दूध थोडे आटल्यावर साखर आणि वेलची पूड टाका.
  • केशर असल्यास, ते गरम पाण्यात भिजवून दुधात टाका.
  • गरम असतानाच खीर बाऊलमध्ये काढून घ्या.
  • बारीक चिरलेल्या बदाम आणि पिस्ताने सजवून गरमागरम किंवा थंडगार सर्व्ह करा. 

टीप

  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स वापरू शकता.
  • मखाना भाजताना तो जास्त जळू नये, याची काळजी घ्या.
  • तुम्ही ही खीर उपवासासाठी बनवत असाल, तर उपवासाचे साहित्य वापरा. 
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews