Shravan Special Recipe : श्रावणात उपवासाला बनवा मऊ लुसलुशीत रताळ्याचा शिरा

Published:
श्रावण महिन्यामध्ये उपवासाला रताळ्याचा शिरा हा एक उत्तम आणि स्वादिष्ट पर्याय आहे. हा शिरा करायला सोपा आहे आणि पौष्टिक देखील आहे.
Shravan Special Recipe : श्रावणात उपवासाला बनवा मऊ लुसलुशीत रताळ्याचा शिरा

श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करतात. यात श्रावणात विशेषत: सोमवार, शनिवारी उपवास करण्याची पद्धत आहे. पण या उपवासाच्या दिवशी अनेकांना काय खावे असा प्रश्न पडतो. यात नेहमी बटाट्याची भाजी, वरईचा भात किंवा रोटी, साबूदाण्याची खिचडी, उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ खाऊन खूप वैगात येतो. तुम्ही उपवासाला वेगळं काही करू शकता. तुम्ही श्रावणात उपवासासाठी रताळ्याचा शिरा बनवू शकता. उपवासासाठी हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या…

साहित्य

  • 2 मोठे रताळी
  • 1/2 कप दूध
  • 1/4 कप साखर (आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता)
  • 2 चमचे तूप
  • 1/4 चमचा वेलची पूड
  • काजू, बदाम (बारीक केलेले) 

कृती

  • रताळी उकडून स्मॅश करून घ्या.
  • कढईत तूप गरम करून त्यात रताळ्याचा स्मॅश करा.
  • मंद आचेवर 2-3 मिनिटे परतून घ्या.
  • दूध आणि साखर घालून चांगले मिक्स करा.
  • दूध आटत आल्यावर वेलची पूड आणि ड्राय फ्रुट्स घालून मिक्स करा.
  • गरमागरम शिरा उपवासासाठी तयार आहे. 

टीप

  • तुम्ही दूध आणि साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.
  • तुम्ही यात तुमच्या आवडीचे ड्राय फ्रुट्स वापरू शकता.
  • शिरा थोडा पातळ आवडत असेल तर दूध थोडे जास्त टाका.
  • शिरा कढईला चिकटू नये म्हणून सतत ढवळत राहा. 
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews