Marathi News

Shravan Special Recipe : श्रावणात काहीतरी हटके ट्राय करा, उपवासात बनवा बटाट्याची जलेबी, सर्वांना आवडेल

Published:
तुम्ही श्रावण महिन्यात उपवासासाठी बटाट्याची जिलेबी नक्की बनवू शकता. ती खायला खूप चविष्ट लागते आणि उपवासाला काहीतरी वेगळं आणि हटके खायची इच्छा पूर्ण होते.
Shravan Special Recipe : श्रावणात काहीतरी हटके ट्राय करा, उपवासात बनवा बटाट्याची जलेबी, सर्वांना आवडेल

श्रावण महिना हा भगवान भोलेनाथाला समर्पित आहे. असं म्हणतात श्रावणातील सोमवारी उपवास केल्याने मनोकामना पूर्ण होतात. आणि उपवास म्हटला की घराघरात उपवासांच्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. श्रावणातल्या उपवासात विविध पदार्थ खाल्ले जाऊ शकतात, उपवासाच्या दिवसांत गोड खाण्याची इच्छा सर्वांनाच होते, पण तीच ती साबुदाण्याची खीर किंवा फलाहारी हलवा खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायचं असेल, तर बटाट्याची जिलेबी एक उत्तम पर्याय आहे. उपवासात बनणारी ही जिलेबी सोपी आणि स्वादिष्ट आहे. त्याची चव केवळ अप्रतिमच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. जाणून घेऊया….

साहित्य

  • उकडलेले बटाटे: ४-५ मध्यम आकाराचे
  • शेंगदाणा कूट: १/४ कप
  • साबुदाणा पीठ: १/४ कप
  • जिरेपूड: १/२ चमचा
  • मिरची पूड: १/२ चमचा (आवडीनुसार)
  • सैंधव मीठ: चवीनुसार
  • साखर: १/२ कप
  • पाणी: १/२ कप
  • तूप किंवा तेल: तळण्यासाठी

कृती

  • उकडलेले बटाटे चांगले कुस्करून घ्या.
  • त्यात शेंगदाणा कूट, साबुदाणा पीठ, जिरेपूड, मिरची पूड आणि सैंधव मीठ घालून चांगले मिक्स करा.
  • पिठाचा गोळा मळून घ्या.
  • जिलेबीच्या साच्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत पीठ भरून गरम तेलात जिलेबी तळून घ्या.
  • दुसरीकडे, साखर आणि पाणी गरम करून एक तारी पाक तयार करा.
  • तळलेल्या जिलेब्या गरम पाकात बुडवून घ्या.
  • गरमागरम जिलेबी उपवासासाठी तयार आहे!
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews