Shravan Special Recipe : श्रावण स्पेशल, उपवासासाठी खास साबुदाणा रबडी नक्की ट्राय करा…

Published:
उपवासाला फळे आणि साबुदाण्याचे विविध पदार्थ खाल्ले जातात.याच उपवासाला आता साबुदाणा रबडी करुन पाहा. चला याची रेसिपी पाहुयात.
Shravan Special Recipe : श्रावण स्पेशल, उपवासासाठी खास साबुदाणा रबडी नक्की ट्राय करा…

उपवास म्हटला की घराघरात उपवासांच्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. श्रावणातल्या उपवासात विविध पदार्थ खाल्ले जाऊ शकतात, आज आम्ही अशाच एका सोप्या रेसिपी बद्दल सांगणार आहोत. श्रावण महिन्यात उपवासासाठी खास, साबुदाणा रबडीची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा! ही रेसिपी तुम्हाला उपवासाच्या दिवसात ऊर्जा देईल आणि चविष्ट देखील लागेल…

साहित्य

  • १ वाटी साबुदाणा (रात्री भिजवलेला)
  • १ लिटर दूध
  • १/२ वाटी साखर (चवीनुसार)
  • १/४ चमचा वेलची पूड
  • बदामाचे काप (आवडीनुसार)
  • पिस्त्याचे काप (आवडीनुसार) 

कृती

  • साबुदाणा रात्री पाण्यात भिजत ठेवा.
  • एका पातेल्यात दूध गरम करा.
  • दूध उकळल्यावर त्यात भिजवलेला साबुदाणा टाका. मंद आचेवर शिजवत राहा.
  • साबुदाणा शिजल्यावर साखर आणि वेलची पूड टाका.
  • सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळत राहा.
  • तयार रबडी गरमागरम किंवा थंड झाल्यावर बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून सजवून सर्व्ह करा. 

टीप

  • साबुदाणा शिजवताना तळाला लागू नये म्हणून सतत ढवळत राहा.
  • साखर तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.
  • तुम्ही यामध्ये केसर देखील घालू शकता.
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews