श्रावण महिना हा भगवान भोलेनाथाला समर्पित आहे. असं म्हणतात श्रावणातील सोमवारी उपवास केल्याने मनोकामना पूर्ण होतात. आणि उपवास म्हटला की घराघरात उपवासांच्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. श्रावणातल्या उपवासात विविध पदार्थ खाल्ले जाऊ शकतात, तुम्ही उपवासाला साबुदाण्याची रसमलाई नक्कीच बनवू शकता. साबुदाणा आणि दुधापासून बनवलेली ही मिठाई उपवासासाठी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे. त्याची चव केवळ अप्रतिमच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. जाणून घेऊया….
साहित्य
- 1 वाटी साबुदाणा
- 1/2 लिटर दूध
- 1/4 वाटी साखर
- 1/4 वाटी मिल्क पावडर
- वेलची पूड
- थोडेसे केसर (आवडीनुसार)
- बारीक चिरलेला पिस्ता (सजावटीसाठी)
कृती
- साबुदाणा 4-5 तास पाण्यात भिजत ठेवा.
- भिजवलेला साबुदाणा व्यवस्थित धुवून घ्या आणि त्यातील पाणी काढून टाका.
- एका पातेल्यात दूध गरम करा. दूध उकळायला लागल्यावर त्यात भिजवलेला साबुदाणा, साखर आणि मिल्क पावडर टाका.
- मध्यम आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
- वेलची पूड आणि केसर टाका.
- गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.
- थंड झाल्यावर मिश्रण हाताने मळून त्याचे छोटे-छोटे गोळे (रसमलाई) बनवा.
- तयार रसमलाई पिस्ताने सजवून थंडगार सर्व्ह करा.
टीप
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
- तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स देखील टाकू शकता.
- तुम्ही ही रसमलाई गरम किंवा थंडगार दोन्ही प्रकारे खाऊ शकता.
- उपवासासाठी बनवत असाल तर, उपवासाचे साहित्य वापरा.






