श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करतात. यात श्रावणात विशेषत: सोमवार, शनिवारी उपवास करण्याची पद्धत आहे. पण या उपवासाच्या दिवशी अनेकांना काय खावे असा प्रश्न पडतो. यात नेहमी बटाट्याची भाजी, वरईचा भात किंवा रोटी, साबूदाण्याची खिचडी, उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ खाऊन खूप वैगात येतो. तुम्ही उपवासाला वेगळं काही करू शकता. तुम्ही श्रावणात उपवासासाठी भगरीचा उपमा बनवू शकता. यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या…
साहित्य
- १ वाटी भगर (भगर किंवा वरई)
- २ वाट्या पाणी
- १ चमचा तेल किंवा तूप
- ½ चमचा जिरे
- १/२ चमचा मिरची (बारीक चिरलेली)
- ½ चमचा आले (बारीक चिरलेले)
- ¼ चमचा साखर
- ½ चमचा मीठ (उपवासाचे)
- १ चमचा शेंगदाणे (भाजलेले, कूट केलेले)
- ½ लिंबू (रस)
- कोथिंबीर (बारीक चिरलेली)
कृती
- भगर स्वच्छ धुवून घ्या आणि १५-२० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
- एका पातेल्यात तेल किंवा तूप गरम करून त्यात जिरे, मिरची आणि आले परतून घ्या.
- भिजवलेली भगर पाण्यातून काढून निथळून घ्या आणि पातेल्यात टाका.
- 2 वाट्या पाणी, मीठ आणि साखर (आवडीनुसार) घालून चांगले मिक्स करा.
- झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या.
- पाणी पूर्णपणे आटल्यावर आणि भगर शिजल्यावर गॅस बंद करा.
- शेंगदाणा कूट आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा.
- गरमागरम उपमा कोथिंबीरने सजवून सर्व्ह करा.
टीप
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या (बटाटा, गाजर, वाटाणे) देखील घालू शकता.
- उपवासाला चालणाऱ्या मसाल्यांचा वापर करू शकता.
- गरम असतानाच उपमा खा.
- उपवासाच्या दिवशी भगरीचा उपमा खाणे आरोग्यासाठी चांगले असते.






