Shravan Somvar 2025 : यंदा शेवटचा श्रावणी सोमवार; शिवामूठ कोणती वाहाल? पूजेचा विधी अन् सर्वकाही

Written by:Smita Gangurde
Published:
१८ ऑगस्ट रोजी शेवटचा श्रावणी सोमवार आहे. संपूर्ण श्रावणी महिन्यात तुम्ही शंकराची मनोभावे पूजा केली असेल. सोमवारी उपास-व्रत वैकल्ये केली असतील, आता शेवटच्या सोमवारी दोन राजयोग जुळून येत आहेत.
Shravan Somvar 2025 : यंदा शेवटचा श्रावणी सोमवार; शिवामूठ कोणती वाहाल? पूजेचा विधी अन् सर्वकाही

shravan somvar 2025 : श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो आणि या महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. पुराणात सांगितले आहे की समुद्रमंथनावेळी निर्माण झालेल्या हलाहल विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शंकराने ते पिऊन संहार टाळला. त्यामुळे त्यांच्या कंठाला निळा रंग आला आणि ते नीलकंठ महादेव म्हणून ओळखले जाऊ लागले.

१८ ऑगस्ट रोजी शेवटचा श्रावणी सोमवार आहे. संपूर्ण श्रावणी महिन्यात तुम्ही शंकराची मनोभावे पूजा केली असेल. सोमवारी उपास-व्रत वैकल्ये केली असतील, आता शेवटच्या सोमवारी दोन राजयोग जुळून येत आहेत. यंदा चौथ्या श्रावणी सोमवारी गजकेसरी आणि गजलक्ष्मी असे दोन राजयोग जुळून येत आहेत.

कशी कराल पूजा, शिवामूठ कोणती वाहाल?

शेवटच्या श्रावणी सोमवारी निराहार उपवास करावा असं म्हटलं जातं. घरातील शिवलिंगाची पूजा करावी, घरात शिवलिंग नसेल तर प्रतिमेची किंवा मंदिरात जाऊन तेथील शिवलिंगाची पूजा करू शकता. अनेकजणं पाटावर शिवलिंगाचे चित्र काढून त्याची पूजा करू शकतात. सुरुवातील महादेवाला दुधानं अभिषेक करावा. यानंतर चंदन, बेलपत्र, अक्षता, पांढरी फूलं, मध, अगरबत्ती, साखर अर्पण करावं. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावाला.

श्रावणी सोमवारी उपवार करावा, मात्र तो दुसऱ्या दिवशी सोडावा. यातही आजारी व्यक्ती, वृद्ध, गर्भवती किंवा ज्यांना फार वेळ उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी रात्री उपवास सोडला तरी चालेल. सकाळी उठल्यानंतर नित्यक्रम उरकून महादेवाचं ध्यान करावं. यावेळी ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा.

 

चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून जव अर्पण करावे लागते. श्रावणी सोमवारी पूजा झाल्यानंतर शिवामूठ अर्पण केली जाते. यावेळी मंत्रोच्चार करावा.

श्रावणातील उपवास आणि वैज्ञानिक कारणे

वैज्ञानिक नजरेतून विचार केला तर “इंटरमिटंट फास्टिंग”सदृश पद्धतींवर आज बराच अभ्यास झाला आहे. उपवासामुळे काही लोकांमध्ये कॅलरी इन्टेक नियंत्रित होतो, पचनतंत्राला विश्रांती मिळते, आणि जेवणाचे वेळापत्रक शिस्तबद्ध होते. यातून इन्सुलिन संवेदनशीलतेत सुधारणा, फुगवटा अपचन कमी होणे अशी लाभदायी चिन्हे दिसू शकतात. श्रावणात प्रचलित साधे, उकडलेले, फलाहारी किंवा कमी मसाल्याचे जेवण मोसमातील जंतुसंसर्गाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. शिवाय, ध्यान-प्राणायामासारख्या साधना स्वायत्त मज्जासंस्थेचा ताण कमी करून हृदयगती व श्वसन लय स्थिर करण्यात हातभार लावतात. ही आरोग्यास पूरक ठरते.