श्रावण स्पेशल, उपवासाला गोड काहीतरी हवंय? ट्राय करा मखाना खीरची रेसिपी

Published:
तुम्हालासुद्धा उपवासाला नवीन काहीतरी ट्राय करायचे असेल तर तुम्ही उपवासाची मखाना खीर बनवू शकता.
श्रावण स्पेशल, उपवासाला गोड काहीतरी हवंय? ट्राय करा मखाना खीरची रेसिपी

Shravan Somwar Special Makhana Kheer:   श्रावण महिन्यात जवळपास सर्वजण उपवास करतात. उपवासाला विविध पदार्थ देखील बनवले जातात. तुम्हालासुद्धा उपवासाला नवीन काहीतरी ट्राय करायचे असेल तर तुम्ही उपवासाची मखाना खीर बनवू शकता. ही रेसिपी उपवासासाठी तर उत्तम आहेच पण त्याची रेसिपीसुद्धा सोपी आहे. चला पाहूया रेसिपी…

 

मखाना खीर बनवण्यासाठी साहित्य-

 

१ लिटर फुल क्रीम दूध
१०० ग्रॅम मखाना
२ चमचे तूप
१/२ वाटी साखर
४ लहान वेलची

 

मखाना खीर बनवण्याची रेसिपी-

 

सर्वप्रथम दूध उकळून घट्ट करा. मखाना तुपात तळून बाजूला ठेवा.

दूध घट्ट झाल्यावर त्यात भाजलेला मखाना घाला. ५ मिनिटे उकळल्यानंतर साखर घाला आणि गॅस बंद करा.

आता वेलची बारीक करून खीरमध्ये घाला.

तुमची स्वादिष्ट मखाना खीर तयार आहे. तुम्ही ते उपवासाला खाऊ शकता.