MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

जन्माष्टमीला बनवा श्रीकृष्णाचा आवडता गोपाळकाला, पाहा पारंपरिक रेसिपी

Published:
आज आपण श्रीकृष्णाचा आवडता गोपाळकाला कसा बनवायचा रेसिपी जाणून घेऊया...
जन्माष्टमीला बनवा श्रीकृष्णाचा आवडता गोपाळकाला,  पाहा पारंपरिक रेसिपी

 Shri Krishna Naivedya Dishes:   गोपाळकाला हा कृष्णाच्या आवडीचा पदार्थ आहे आणि जन्माष्टमीच्या सणाला तो आवर्जून बनवला जातो. हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, जो पोहे, लाह्या, दही, लोणचं आणि फळं एकत्र करून बनवला जातो.

 

गोपाळकाला बनवण्यासाठी साहित्य-

पातळ पोहे
भाजलेल्या लाह्या
दही
ताक
गूळ
लिंबाचे किंवा आंब्याचे लोणचे
फळांच्या फोडी
शेंगदाणे
बारीक चिरलेली कोथिंबीर
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली मिरची
मीठ
जिरेपूड
हिंग
तेल

 

गोपाळकाला बनवण्याची रेसिपी-

 

पोहे आणि लाह्या थोड्या वेळ पाण्यात भिजवून घ्या.

एका भांड्यात भिजवलेले पोहे, लाह्या, दही, ताक, गूळ, लोणचे, फळांच्या फोडी, शेंगदाणे, कोथिंबीर, कांदा, मिरची, मीठ, जिरेपूड आणि हिंग घालून चांगले मिक्स करा.

चवीनुसार मीठ आणि गूळ घाला.

शेवटी, थोडेसे तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी करून घ्या.

फोडणी गोपाळकाल्यावर ओतून मिक्स करा.

अशाप्रकारे तुमचा गोपाळकाला तयार आहे.