Lucky zodiac signs for the month of September: ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र सतत एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत असतात. ग्रहांच्या स्थान बदलाने राशीचक्रातील बाराही राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव दिसून येतो. काही राशींसाठी हे संक्रमण अतिशय फायदेशीर असते. दरम्यान शुक्र ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब चमकणार आहे.
१५ सप्टेंबरला शुक्र ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या राशीत आधीच केतू विराजमान आहे. त्यामुळे सिंह राशीत सिंह आणि केतूची युती जुळून येत आहे. सिंह आणि केतूची युती काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या राशींना या युतीचा आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, वैवाहिक अशा विविध क्षेत्रात फायदा मिळणार आहे. पाहूया या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत….
मेष-
सूर्य आणि केतू ग्रहाची युती मेष राशीसाठी अत्यंत लाभदायक असणार आहे. या युतीदरम्यान मेष राशीच्या विद्यार्थ्यांची अभ्यासात चांगली प्रगती होईल. खासकरून संशोधन करत असलेल्यांना यश प्राप्त होईल. तसेच प्रेमीयुगलांसाठीसुद्धा ही युती खास असणार आहे. याकाळात तुम्ही आपल्या जोडीदारासोबत लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकता. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नोकरीत प्रगती होईल.
तूळ-
तूळ राशीच्या लोकांसाठीसुद्धा सूर्य आणि केतूची युती लाभदायक ठरणार आहे. यादरम्यान आर्थिक अडचणी दूर होऊन आर्थिक स्थैर्य येईल. उद्योग-व्यवसायात नफा मिळेल. तसेच नवीन उद्योग-व्यवसाय सुरु करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. तुमच्या भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल.
वृश्चिक-
सूर्य आणि केतूची युती वृश्चिक राशीच्या लोकांसाठीसुद्धा अतिशय लाभदायक आहे. याकाळात कला, संगीत क्षेत्रात असणाऱ्या लोकांना चांगले यश मिळेल. करिअरमध्ये नवनव्या संधी उप्लब्ध होतील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना नाव कमावण्याची संधी मिळेल. सर्वत्र वाहवाह होईल. सुखसमृद्धी लाभेल.
धनु-
सूर्य आणि केतूची युती धनु राशीच्या लोकांसाठीसुद्धा चांगली असणार आहे. याकाळात धार्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. माता लक्ष्मीची कृपादृष्टी लाभून आर्थिक समृद्धी येईल. घरात धनधान्याची भरभराटी होईल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






