मारुती स्तोत्र पठणाने आरोग्य सुधारते, भूतबाधा, नकारात्मक ऊर्जा आणि ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते, तसेच मानसिक स्पष्टता, धैर्य, संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते. रोज मारुती स्तोत्र ऐकल्याने किंवा पठण केल्याने मनाला सकारात्मकता, बळ आणि चैतन्य मिळते. तसेच नकारात्मक शक्तींपासून संरक्षण होते. त्यामुळे आज जाणून घेऊयात मारुती स्तोत्र पठण करण्याचे काय फायदे आहेत…
भूतबाधे पासून मुक्ती
‘भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही’ मारुती स्तोत्रा मधील या पंक्ती मारुतीच्या शक्तींचे वर्णन करतात. एखाद्या व्यक्तीवर नकारात्मक शक्ती असेल तर अशा व्यक्तीला मारुतीची आराधना करायला सांगतात. अशा व्यक्तींनी नियमित मारुती स्तोत्र म्हंटले की त्यांना भुतबाधेपासून मुक्ती मिळते.
सुदृढ आरोग्य लाभते
मारुती स्तोत्र पठणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे होतात, जसे की सुदृढ आरोग्य, चिंतामुक्त जीवन, ग्रहदोष निवारण आणि जीवनातील अडथळ्यांवर मात करता येते. या स्तोत्राचे पठण केल्याने आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते.
मारुती स्तोत्र
भीमरुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती |
वानरी अंजनीसुता रामदूता प्रभंजना ||१||
महाबली प्राणदाता सकलां उठावी बलें |
सौख्यकारी दुखहारी दूत वैष्णव गायका ||२||
दिननाथा हरिरुपा सुंदरा जगदान्तरा |
पातालदेवताहन्ता भव्यसिंदूर लेपणा ||३||
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथ पुरातना |
पुन्यवंता पुन्यशिला, पावणा पारितोषिका ||४||
ध्वजांगे उचली बाहो आवेशें लोटला पुढे |
कालाग्नी कालरुद्राग्नी देखतां कापती भएँ ||५||
ब्रह्मांडे माइली नेडों, आंवले दंत्पंगति |
नेत्राग्नि चालिल्या ज्वाला भ्रुकुटी ताठिल्या बलें ||६||
पुच्छ ते मुरडिले माथा किरीटी कुण्डले बरीं |
सुवर्ण कटी कन्सोटी घंटा किंकिणी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातलू |
चपलांग पाहतां मोठे महाविद्धुल्लतेपरी ||८||
कोटीच्या कोटि उद्धाने झेपावे उतरेकडे |
मन्द्राद्रीसारिखा द्रोनू क्रोधे उत्पाटीला बलें ||९||
आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगति |
मनासी टाकिलें मांगे गतिसी तुलणा नसे ||१०||
अणुपासोनि ब्रह्मंडाएवढा होत जातसे |
तयासी तुलणा कोठे मेरु मंदार धाकूटे ||११||
ब्रह्मंडा भोवते वेढे, वज्र पुच्छे करू शके |
तयासी तुलणा कैची, ब्राहमडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिले डोला ग्रासिले सूर्य मंडला |
वाढतां-२ वाढे भेदिले शुन्यमंडला ||१३||
धन-धान्य पशूवृद्धि, पुत्र-पौत्र संग्रही |
पावती रूप विद्द्यादी स्तोत्र पाठे करुनिया ||१४||
भूतप्रेत सम्नधादी, रोग-व्याधि समस्तही |
नासति टूटती चिंता आनन्दे भिमदर्शने ||१५||
हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभाली बरी |
दृढ़देहो निसंदेहो संख्या चन्द्रकला गुणे ||१६||
रामदासी अग्रगन्यु, कपिकुलासी मंदणु |
अंतरात्मा दर्शने दोष नासती ||१७||
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)