Gemstones for marriage: वास्तु शास्त्राप्रमाणेच रत्न शास्त्रसुद्धा अतिशय प्राचीन आणि महत्वाचे शास्त्र आहे. रत्न शास्त्रामध्ये प्रत्येक अडचणीसाठी विविध रत्ने सुचविण्यात आली आहेत. त्या-त्या कार्यासाठी ते-ते रत्न धारण केल्याने अडचणी दूर होऊन सुखसमृद्धी येण्यास मदत मिळते. रत्न शास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अडचणीनुसार आणि राशीनुसार रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
त्याप्रमाणे रत्न शास्त्रात विवाह जुळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीसुद्धा रत्न सुचविण्यात आले आहेत. अनेकदा सर्वकाही व्यवस्थित असूनही लग्न जमण्यात अडचण येत असते. अनेक स्थळे पाहूनसुद्धा लग्न जुळून येत नाही. अशा वेळी ग्रह दोष दूर करण्यासाठी आणि विवाह जुळविण्यासाठी काही रत्ने विशेष मदत करतात. आज आपण अशाच काही रत्नांबाबत जाणून घेणार आहोत….
गोमेद-
गोमेद हे रत्न अतिशय महत्वाचे रत्न आहे. हे रत्न धारण केल्याने विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होऊन नातेसंबंध जुळण्यास मदत होते. गोमेद रत्न राहूची स्थिती मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे लवकर लग्नाचे योग जुळून येतात. लग्न जुळत नसल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने गोमेद धारण करणे योग्य असते.
नीलम-
नीलम रत्न धारण केल्याने विवाह जुळविण्यात मदत मिळते. लग्न जमण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात. तसेच नीलम रत्न धारण केल्याने वैवाहिक आयुष्य सुखी होते. या रत्नामुळे वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर होतात. नात्यातील विश्वास वाढते. पती पत्नीच्या नात्यामध्ये सामंजस्य आणि विश्वास निर्माण होते. प्रत्येक कार्यात एकमेकांचे सहकार्य लाभते.
रुबी-
रुबी धारण केल्याने लग्न जुळून येते. लग्न जुळून येण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात. तसेच लवकर लग्नाचे योग जुळून येतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने रुबी धारण करणे चांगले असते.
पुखराज-
रत्न शास्त्रामध्ये पुखराज रत्नाला विशेष महत्व आहे. हे रत्न लग्न जुळविण्यात मदत करते. खासकरून हे मुलींसाठी फायदेशीर आहे. ज्या मुलींचे लग्न जुळून येत नाहीत त्यांनी हे रत्न धारण केल्यास फायदा मिळतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






