Which gemstone is good for getting money: रत्न शास्त्रामध्ये विविध रत्नांच्या सहाय्याने मनुष्याच्या अडचणी दूर करण्यात येतात. रत्न शास्त्रामध्ये प्रत्येक कार्यसाठी एक वेगळे रत्न सुचविण्यात आले आहे. सर्वांनाच एकच रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात येत नाही. प्रत्येकाच्या राशीनुसार वेगवेगळे रत्न सुचविण्यात येतात.
तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य राशीनुसार योग्य रत्न धारण केल्यास त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो. त्यामुळे रत्न धारण करताना नेहमीच त्यातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच ते धारण करावे. अनेकांना आर्थिक अडचणी येत असतात. आर्थिक फायद्यासाठी रत्नशास्त्रात काही रत्न सुचविण्यात आले आहेत. त्यानुसार कोणते रत्न धारण करायचे हे जाणून घेऊया…
सिट्रिन-
सिट्रिन रत्न धारण केल्यानेसुद्धा आर्थिक स्थिती भक्कम होण्यास मदत होते. हे रत्न धारण केल्यानेच नव्हे तर तिजोरीमध्ये ठेवल्यानेही पैसे येण्यास मदत मिळते.
ग्रीन ऍव्हेंच्युरीन-
रत्न शास्त्रानुसार हे रत्न धन आकर्षित करते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर हे रत्न धारण करणे फायदेशीर ठरते. यामुळे तुम्हाला पैशांची प्राप्ती होते.
गार्नेट-
आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी गार्नेट रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. रत्नशास्त्रामध्ये गार्नेट हे राहूचे रत्न समजले जाते. गार्नेट धारण केल्यास आर्थिक अडचणी होतात. हे रत्न धारण केल्यास विविध परंतु योग्य मार्गांनी पैसे येण्यास मदत मिळते. रविवारी गार्नेट धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
पुखराज-
रत्न शास्त्रानुसार, सोनेरी पुखराज रत्न धारण केल्याने आर्थिक चणचण दूर होते. या शास्त्रानुसार, जर तुम्हालाही सतत आर्थिक नुकसान होत असेल किंवा घरात पैसा राहत नसेल तर सोनेरी पुखराज धारण करावे. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील. शिवाय मानसन्मातही वाढ होईल.
पायराइट-
रत्न शास्त्रानुसार पायराइट धारण केल्याने आर्थिक स्थिती सुधारते. विविध मार्गांनी पैसे येण्यास मदत मिळते. तुमच्या सुखसमृद्धीमध्ये वाढ करण्यासाठीही पायराइट धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






