रागावर नियंत्रण ठेवून मानसिक शांती देते ‘हे’ रत्न, जाणून घ्या धारण करण्याची योग्य पद्धत

Published:
रत्न शास्त्रात, राग कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी काही रत्न सुचविण्यात आली आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे रत्न धारण केल्यास नक्कीच फायदा मिळतो.
रागावर नियंत्रण ठेवून मानसिक शांती देते ‘हे’ रत्न, जाणून घ्या धारण करण्याची योग्य पद्धत

Which gemstone to use to control anger:    वास्तूशास्त्रनुसार रत्नशास्त्रसुद्धा तितकेच महत्वाचे आहे. रत्नशास्त्रात, मनुष्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी रत्नांचा वापर केला जातो. प्रत्येक अडचणीसाठी वेगवगेळे रत्न सुचविण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे रत्न सुचविण्यात आले आहेत. रत्न धारण केल्याने या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

मनुष्याच्या स्वभावावर सकारात्मक प्रभाव-

रत्न शास्त्रानुसार, रत्न धारण केल्याने मनुष्याच्या स्वभावावरसुद्धा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य रत्न धारण करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे रत्न राग कमी करण्यासाठीसुद्धा मदत करते. एखाद्या व्यक्तीला सतत राग येत असतो. छोट्या-छोट्या गोष्टीमुळे अनेकजण राग करतात. त्यामुळे वादविवाद होतात. शिवाय मानसिक आरोग्यसुद्धा बिघडते.

त्यामुळेच रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. रत्न शास्त्रात, राग कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी काही रत्न सुचविण्यात आली आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे रत्न धारण केल्यास नक्कीच फायदा मिळतो. शिवाय राग नियंत्रित झाल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. पाहुया हे रत्न कोणते आहेत…

 

मानसिक शांती मिळवण्यासाठी कोणते रत्न वापरावे?

रत्न शास्त्रानुसार मोती धारण केल्याने मानसिक शांती मिळते. त्यामुळे राग नियंत्रित करणे सोपे होते. मोती हे रत्न चंद्राशी संबंधित असल्याने भावना नियंत्रित करण्यास मदत मिळते. त्यामुळे सतत राग येत असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने मोती धारण करणे योग्य आहे.

मोती धारण करण्यासाठी योग्य दिवस-
रत्न शास्त्रानुसार, मोती हे रत्न चंद्राशी संबंधित आहे. त्यामुळे मोती धारण करण्यासाठी सोमवारचा दिवस योग्य आहे. शिवाय मोती धारण करण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण करणेदेखील आवश्यक आहे. शिवाय मोती चांदीच्या धातूमध्ये बसवून वापरणे फायदेशीर असते.

मोती कधी आणि कोणत्या बोटामध्ये धारण करावे?
शास्त्रानुसार, सर्वप्रथम मोती गंगाजल, दूध आणि मधात बुडवून त्याचे शुद्धीकरण करावे. नंतर ते महादेवाच्या चरणी अर्पण करावे. त्यांनतर विधीनुसार पूजा करून ते कनिष्ठ बोटामध्ये धारण करावे.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)