Tips To Save Money : आपल्यापैकी अनेक जण असे असते ज्यांचा पगार झाला की पुढच्या पाच ते दहा दिवसातच त्यांचे पाकीट मोकळं होतं. पैसा येतो खरा, परंतु तो खर्च व्हायला वाटा मात्र 100 असतात…. अखेर कितीही पैसा आला तरी महिना अखेरीस कोणाकडे ना कोणाकडे उधारी मागण्याची वेळ येते. आपण कितीही पैशाची बचत करायचे ठरवलं तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो जातोच. तुमच्या बाबतीत सुद्धा असं काहीसं होत असेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला असे काही वास्तू उपाय सांगणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्ही या संकटावर मात करू शकता.
घरातील नळातून पाणी टपकणे बंद करा
घरातील नळातून पाणी टपकणे वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की याचा संपत्तीच्या सकारात्मक उर्जेवर परिणाम होतो. खर्च वाढतो आणि बचत करणे कठीण होते. म्हणून, तुमच्या घरात कुठेही गळणारे नळ नसतील याची खात्री करा.
घरात पैसे ठेवण्याची दिशा (Tips To Save Money)
दिशेचाही संपत्तीच्या उर्जेवर परिणाम होतो. कधीही दक्षिणेकडे तोंड असलेली तिजोरी ठेवू नका. तुम्ही नैऋत्येकडे तिजोरी ठेवू शकता, परंतु ती उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावी. हा उपाय केल्याने तुमच्या हातात पैसा नेहमीच राहील. Tips To Save Money
घरात लावायची झाडे
झाडे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. या सकारात्मक उर्जेचा संपत्तीवर सकारात्मक परिणाम होतो. म्हणून, घरात झाडे आणि रोपे लावा आणि पैशाला निमंत्रण द्या.
घरात स्वच्छतेचे महत्त्व
असे म्हटले जाते की जिथे घाण असते तिथे देवी लक्ष्मी वास करत नाही. म्हणून, तुमचे घर, कार्यालय आणि कामाचे ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे. घरात स्वच्छता असेल तर लक्ष्मी येते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





