Marathi News

कर्ज आणि सततच्या EMI मुळे बेजार? ‘हे’ आध्यात्मिक आणि आर्थिक नियोजनाचे उपाय ठरू शकतात फायदेशीर!

Written by:Rohit Shinde
Published:
महागाई वाढल्याने आणि उत्पन्न स्थिर नसल्याने हप्ते वेळेवर भरणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत काही अध्यात्मिक तसेच आर्थिक नियोजनाचे उपाय तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.
कर्ज आणि सततच्या EMI मुळे बेजार? ‘हे’ आध्यात्मिक आणि आर्थिक नियोजनाचे उपाय ठरू शकतात फायदेशीर!

आजच्या काळात वाढत्या कर्जामुळे आणि ईएमआयच्या ओझ्यामुळे अनेक नागरिक बेजार झाले आहेत. घर खरेदी, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज, तसेच वैयक्तिक कर्ज यांच्या हप्त्यांच्या ताणाखाली सामान्य माणूस दबून गेला आहे. महागाई वाढल्याने आणि उत्पन्न स्थिर नसल्याने हप्ते वेळेवर भरणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत काही अध्यात्मिक तसेच आर्थिक नियोजनाचे उपाय तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.

कर्जबाजारी झाल्यानंतर सुटका कशी करावी?

कितीही पैसा कमावला तर तो हातात टिकत नाही. अशा अनेक समस्या तुमच्या घरात असलेल्या वास्तुदोषामुळे निर्माण होऊ शकतात. हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. तुळस ही विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते. ज्यामुळे ज्या घरात तुळस आहे, त्या घरावर सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहातो. तिजोरी पैशांनी भरलेली राहाते. कर्जातून सुटका मिळते. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह असावं, यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरात नेहमी सकारात्म ऊर्जा प्रवाहित होते. यामुळे तुमच्या अनेक समस्या निर्माण होण्यापूर्वीच नष्ट होतात. मच्या घरात असलेल्या तिजोरीचं स्थान हे योग्य असणं महत्त्वाचं असतं, ज्यामुळे तुमच्यावर कधीही आर्थिक संकट येत नाही. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील तिजोरी ही नेहमी दक्षिण -पश्चिम दिशेला असावी.

कर्जातून सुटण्यासाठी कसे कराल आर्थिक नियोजन?

कर्जाच्या जाळ्यातून सुटण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन फार महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम आपण घेतलेल्या कर्जांची यादी तयार करून कोणते कर्ज जास्त व्याजदराचे आहे ते ओळखा. जास्त व्याजाचे कर्ज सर्वप्रथम फेडण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवून अनावश्यक खर्च टाळा. दर महिन्याला उत्पन्नातील ठराविक रक्कम बचतीसाठी बाजूला ठेवावी. क्रेडिट कार्डचे हप्ते वेळेवर भरणे अत्यावश्यक आहे, अन्यथा अतिरिक्त व्याजाचा बोजा वाढतो.

शक्य असल्यास एकाच वेळी अनेक कर्जे एकत्र करून कमी व्याजदरावर कर्जफेडीची योजना बनवा. अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत जसे की पार्ट-टाईम काम, गुंतवणूक किंवा लहान व्यवसाय सुरू करण्याचा विचार करावा. आर्थिक शिस्त आणि योग्य बजेटिंगमुळे हळूहळू कर्ज कमी करता येते. गरज पडल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन योग्य गुंतवणूक आणि बचत योजना आखाव्यात. सातत्यपूर्ण प्रयत्न, संयम आणि नियोजनाने कर्जातून मुक्तता मिळवणे शक्य आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews