देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा ७ वस्तू, नकारात्मकता होईल दूर

Published:
वास्तू शास्त्रानुसार अशा काही वस्तू आहेत ज्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा ७ वस्तू, नकारात्मकता होईल दूर

Remedies to please Goddess Lakshmi:   वास्तू शास्त्रानुसार घरातील मुख्य प्रवेशद्वार घरातील सकारत्मक ऊर्जेचे केंद्र असते. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराजवळ चांगल्या वस्तू ठेवणे अत्यंत आवश्यक असते. शास्त्रानुसार घराच्या प्रवेशद्वाराजवळ चुकीच्या वस्तू ठेवल्याने वास्तू दोष निर्माण होतो. त्यामुळे घराचा मुख्य प्रवेशद्वार नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटका ठेवला पाहिजे.

वास्तू शास्त्रानुसार अशा काही वस्तू आहेत ज्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तसेच देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. त्यामुळे घरात नेहमीच सुखसमृद्धी आणि धनधान्य येते. शास्त्रानुसार अशा ५ वस्तू आहेत ज्या अत्यंत उपयुक्त असतात. त्या वस्तू कोणत्या आहेत आपण जाणून घेऊया…

 

स्वस्तिकचे चिन्ह-

हिंदू धर्मात स्वस्तिकला विशेष महत्व आहे. प्रत्येक पूजेमध्ये किंवा शुभ कार्यात स्वस्तिक चिन्ह बनवले जाते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढणे अत्यंत चांगले असते. त्यामुळे घरात देवी लक्ष्मी प्रवेश करते. आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

 

घोड्याची नाल-

वास्तू शास्त्रानुसार घरात घोड्याची नाल ठेवणे अत्यंत चांगले समजले जाते. नेहमी मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला घोड्याची नाल लावावी. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. नकारत्मक ऊर्जा दूर राहते. देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. त्यामुळे घरात सुखसमृद्धी वाढते.

 

तोरण लावा-

मुख्य दरवाजाजवळ आंब्याच्या पानांचे तोरण लावणे अतिशय चांगले असते. त्यामुळे घरात सकारात्मकता येते. परंतु तोरण लावताना त्यातील सर्व पाने हिरवीगार आहेत का ते तपासा. तोरणमध्ये सुकलेली किंवा फाटकी पाने वापरू नयेत.

 

शुभ-लाभ-

घराच्या मुख्य दरवाजाजवळ लाल चंदनाचा वापर करून शुभ लाभ लिहा. असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते. घरातील अडचणी दूर होतात.

 

दिवा लावणे-

दररोज सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावणे चांगले असते. असे केल्याने घरात देवी लक्ष्मी प्रवेश करते. त्यामुळे घरात सकारात्मकता येते.

 

तुळशी-

घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुळशीचे रोप लावणे चांगले असते. दररोज तुळशीसमोर दीप प्रज्वलित करा.

 

सूर्य यंत्र-

घराच्या मुख्य दरवाजाजवळ सूर्य यंत्र अवश्य लावा. असे केल्याने घराला वाईट नजर लागत नाही. नकारात्मक ऊर्जा दूर होते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)