वैष्णोदेवीच्या भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आज पासून माता वैष्णो देवीची यात्रा (Vaishno Devi Yatra) पुन्हा सुरू झाली. गेल्या काही दिवसापासून जम्मू कश्मीर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं होतं… या भूस्खलनात तब्बल ३४ जणांना आपला प्राण गमवावा लागला तर २० अधिक जखमी झाले होते…. पार्श्वभूमीवर नको असून वैष्णोदेवीची यात्रा स्थगित करण्यात आली होती. मात्र आता पावसाचा जोर ओसरल्यानंतर पुन्हा एकदा ती भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.
काय म्हणाले अधिकारी ?
आज श्राइन बोर्डाने अनुकूल हवामानाच्या अधीन राहून वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. कटरा येथे अडकलेल्या यात्रेकरूंना तीर्थयात्रा पुन्हा सुरू झाल्याची बातमी ऐकून आनंद झाला. भाविकांनी देवीच्या नावाचा जयघोष केला.. दोन्ही मार्गांवर सकाळी ६ वाजता ही यात्रा सुरू झाली. श्राइन बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यात्रा पुन्हा सुरू होणे (Vaishno Devi Yatra) ही आमच्या सामूहिक श्रद्धेची पुष्टी आहे आणि बोर्ड या पवित्र मंदिराचे पावित्र्य, सुरक्षा आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी वचनबद्ध आहे.
सुरक्षा मार्गदर्शक तत्वे – Vaishno Devi Yatra
वैष्णोदेवीची यात्रा जरी पुन्हा एकदा भाविकांसाठी सुरू झाली असली तरी श्राइन बोर्डाने यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी अनेक मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार , यात्रेदरम्यान सर्व यात्रेकरूंसाठी वैध ओळखपत्रे आणि आरएफआयडी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहेत. तसेच यात्रेकरूंना नियुक्त केलेल्या मार्गांचे पालन करण्याचे आणि ग्राउंड स्टाफला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्राइन बोर्डाने सर्व यात्रेकरूंचे संयम आणि सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
नवरात्रीदरम्यान भाविकांची गर्दी
वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू झाल्यानंतर, मंडळाने अनेक महत्त्वाची सुरक्षा मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वैष्णोदेवी ला, मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे.






