Marathi News

अंगावर कोळी चढण्याचे काय आहेत संकेत, जाणून घ्या…

Published:
घरामध्ये कोळी असणे किंवा घरामध्ये कोळ्याचे जाळे असणे अशुभ मानले जात असले तरी, कोळी दिसणे किंवा अंगावर चढणे हा एखादा शुभ संकेत असू शकतो.
अंगावर कोळी चढण्याचे काय आहेत संकेत, जाणून घ्या…

हिंदू धर्मात कीटक आणि प्राण्यांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्या आजूबाजूला असे अनेक प्राणी आहेत जे आपल्याला शुभ किंवा अशुभ संकेत देतात. यातील काही प्राणी असे आहेत की आपण त्यांना घराबाहेर फेकून देतो, काही प्राणी असे आहेत की जे घरातच राहतात. घरात पाल, कोळी, माश्या इत्यादी प्राणी आढळतात. आज आम्ही तुम्हाला कोळ्याशी संबंधित अशाच काही गोष्टी सांगणार आहोत. अर्ध्याहून अधिक लोकांच्या घरात कोळी दिसतात. कोळ्याच्या संदर्भात अनेक शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितली जातात. आज आपण कोळीशी संबंधित काही शुभ आणि अशुभ गोष्टींबद्दल जाणून घेऊया. 

कोळी अंगावर चढलेला दिसणं

ज्योतिषशास्त्रानुसार, घरात कोळी असणे किंवा जाळे बनवणे हे सर्व प्रकारे अशुभ मानले जाते. पण जर कोळी तुमच्या शरीरावर चढला तर ते एक शुभ चिन्ह मानले जाते. तुमच्या अंगावर कोळी चढणे म्हणजे तुम्हाला नवीन कपडे मिळणार आहेत. कोळ्याच्या जाळ्यात नावाचे अक्षर दिसल्यास, नफा मिळण्याची किंवा चांगली बातमी येण्याची शक्यता असते.

भिंतीवर कोळी चढलेला दिसणं

तुम्ही अनेकदा तुमच्या घरांच्या भिंतींवर कोळी चालताना पाहिले असतील. पण तुम्हाला माहिती आहे का की कोळीच्या हालचालीवरूनही शुभ आणि अशुभ चिन्हे ओळखता येतात. जर भिंतीवर कोळी खालून वर जाताना दिसला तर ते शुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच तुमच्या कामात यश मिळणार आहे. तुम्ही तुमच्या कामात लवकर प्रगती कराल. तुम्हाला लवकरच चांगली नोकरी किंवा व्यवसायात प्रगती मिळू शकते. कोळी तुमच्या घरात जाळे विणताना दिसला, तर लवकरच यश मिळण्याची शक्यता असते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews