Vastu Shastra Tips: घरात वादविवाद होत असल्याने घराचे वातावरण बिघडते. यामुळे मूड तर बिघडतोच पण मानसिक आरोग्यावरसुद्धा वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे सतत चिडचिड होते. घरामध्ये सतत वादविवाद होत असल्याने आर्थिक आणि सामाजिक नुकसानसुद्धा होते. त्यामुळे तुमची प्रगती होत नाही. म्हणूनच वास्तू शास्त्राची मदत घेतली जाते.
वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये सामंजस्य आणि सुख समृद्धी येण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक असते. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. शिवाय घरातील वातावरण आनंदी होते. त्यामुळे घरात वादविवाद आणि भांडण होणे थांबते. आज आपण घरात वादविवाद आणि भांडण होऊ नये म्हणून वास्तू शास्त्राचे काही उपाय जाणून घेऊया…
घरातील मतभेद दूर करण्यासाठी उपाय-
कापूर-
अनेक धार्मिक कार्यांमध्ये आणि पूजेमध्ये कापूरचा उपयोग केला जातो. तसेच कापूरच्या वापराने वास्तू दोष दूर करता येतात. तुमच्याही घरात सतत वादविवाद आणि भांडण होत असतील तर, दररोज रात्री एक कापूरची वडी घेऊन ती गाईच्या तुपात बुडवून एका पितळेच्या भांड्यात जाळून टाका. असं केल्याने घरातील भांडणे दूर होतात. आणि घरात शांती आणि सुखसमृद्धी येते. याशिवाय आठवड्यातून एकदा कपूर जाळून त्याचा धूर घरात पसरवा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
कदंबाच्या झाडाची फांदी-
वास्तू शास्त्रानुसार, तुमच्याही घरात सतत वादविवाद आणि भांडण होत असतील, तर तुम्ही घरात पांढऱ्या चंदनाची मूर्ती ठेवायला हवी. असे केल्याने आपापसांतील भांडण मिटते आणि प्रेम आणि सन्मान वाढण्यास मदत होते. तसेच कदंबाच्या झाडाची फांदी घरात ठेवणेसुद्धा चांगले असते. ही फांदी ठेवल्याने घरात सुखसमृद्धी आणि पैसे येतात. आर्थिक स्थिती सुधारते.
सैंधव मीठ-
वास्तू शास्त्रानुसार, मिठाचा वापर करून घरातील वादविवाद आणि भांडणे कमी करता येतात. खरं तर शास्त्रानुसार, मीठ नकारात्मकता दूर करते. त्यामुळे घरातील अनेक समस्या दूर होतात. यासाठी घरातील एका कोपऱ्यात सैंधव मिठाचा एक खडा ठेवा. एक महिना हा तुकडा इथेच राहू द्या. महिन्यांनंतर तो काढून त्या ठिकाणी मिठाचा नवीन खडा ठेवा. असे केल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. घरात वादविवाद कमी होतात. शिवाय घरात सुखसमृद्धी येते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






