Tips to remove evil eye from home: वास्तु शास्त्रानुसार अनेकदा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. किंवा घराला वाईट नजर लागते. घराला वाईट नजर लागल्याने घरात सतत वादविवाद, भांडणे, आजारपण, आर्थिक अडचणी आणि विविध समस्या दिसून येतात. त्यामुळे घराला नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
वास्तु शास्त्रानुसार, घरात काही छोटे-छोटे उपाय केल्याने वाईट नजर दूर होण्यास मदत होते. घरातील नकारत्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी वास्तु शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. घरात काही उपाय केल्यास तुम्हाला वाईट नजरेपासून बचाव करण्यास मदत मिळू शकते. चला पाहूया हे वास्तु उपाय काय आहेत….
लिंबू-मिरच्या-
वास्तु शास्त्रानुसार घरातील वाईट नजर दूर करण्यासाठी शनिवारी मुख्य दरवाजाला लिंबू आणि मिरच्या लटकवा. असे केल्याने वाईट नजर दूर होण्यास मदत होते. प्रत्येक शनिवारी लिंबू-मिरच्या बदलून नवीन लावा.
मीठाचे पाणी-
वास्तु शास्त्रानुसार घरातील फरशी मीठाच्या पाण्याने पुसून घेतल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरातील सदस्यांना वाईट नजर लागत नाही. घरात सुखसमृद्धी येते.
कापूर-
वास्तु शास्त्रानुसार, दररोज सकाळी घरात कापूर जाळा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. वाईट नजर दूर होण्यास मदत होते. तसेच लोबान, धूप किंवा शेणीसुद्धा जाळणे चांगले असते.
कचरा ठेऊ नका-
वास्तु शास्त्रानुसार घराच्या छतवर मोठ्या प्रमाणात कचरा साठू देऊ नका. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते. घराला वाईट नजर लागते. त्यामुळे नेहमीच घरात स्वच्छता ठेवा. असे केल्याने घरातील वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक राहील.
भक्तिगीते ऐका-
वास्तु शास्त्रानुसार घरातील वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक ठेवण्यासाठी घरात सतत भक्तिगीते ऐका. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. घरात सुखसमृद्धी येते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





