Marathi News

Vastu Tips: जुन्या झाडूची विल्हेवाट कशी लावावी? जाणून घ्या वास्तु शास्त्राचे नियम

Published:
वास्तू शास्त्रानुसार, घरात नवी केरसुणी आणल्यानंतर तिची भक्तिभावाने माता लक्ष्मीचे प्रतीक समजून पूजा करावी.
Vastu Tips: जुन्या झाडूची विल्हेवाट कशी लावावी? जाणून घ्या वास्तु शास्त्राचे नियम

Vastu Shastra Tips In Marathi:   वास्तु शास्त्र हे अत्यंत प्राचीन शास्त्र आहे. अनेक वर्षांपासून या शास्त्राचा अवलंब केला जात आहे. हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला अत्यंत महत्व आहे. प्रत्येक गोष्ट वास्तू शास्त्राच्या नियमानुसार केली जाते. असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते असे म्हटले जाते. त्यामुळेच केरसुणी खरेदी करतानासुद्धा शुभ मुहूर्त पाहणे आवश्यक असते. शुभ मुहूर्तावर केरसुणी खरेदी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. शिवाय सुखसमृद्धी येते.

वास्तु शास्त्रानुसार आठवड्यातील दोन दिवस केरसुणी खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ समजले जातात. त्यानुसार शुक्ल पक्षाच्या पहिल्या आठवड्यात किंवा गुरुवार-शुक्रवारी केरसुणी खरेदी करणे अत्यंत चांगले असते. यादिवशी केरसुणी खरेदी केल्याने चांगले लाभ मिळतात. शास्त्रानुसार केरसुणीला अत्यंत आदराने घरात आणावे. शिवाय केरसुणी कधीही जमिनीवर ठेऊ नये. ती नेहमीच स्वच्छ आणि उंच जागेवर ठेवा. असे केल्याने घरात सकारत्मक ऊर्जा प्रवेश करते.

 

जुन्या केरसुणीचे काय करावे?

वास्तू शास्त्रानुसार, जुनी केरसुणी कचराकुंडीत फेकू नये. ती केरसुणी एखाद्या मोकळ्या जागेवर ठेऊन द्या. शनिवारी जुनी केरसुणी बाहेर करणे चांगले असते. नवी केरसुणी खरेदी करण्यापूर्वी जुनी केरसुणी बाहेर करा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

हळदी-कुंकू लावा-
वास्तू शास्त्रानुसार, घरात नवी केरसुणी आणल्यानंतर तिची भक्तिभावाने माता लक्ष्मीचे प्रतीक समजून पूजा करावी. स्वच्छ पाण्याने ती धुवून घ्यावी. तसेच हळदी-कुंकू लावावे. आणि नंतर योग्य जागेवर ठेवावे. असे केल्याने घरामध्ये धनधान्याची भरभराटी होते.

शास्त्रानुसार झाडू-केरसुणी नेहमी दक्षिण-पश्चिम किंवा पश्चिम दिशेला ठेवावे. स्वयंपाकघरात किंवा पूजाघरात कधीच केरसुणी ठेऊ नये. केरसुणी नेहमीच लपवून ठेवावी, जेणेकरून बाहेरील व्यक्तींची नजर त्यावर पडू नये. झाडू उलट ठेवणे टाळावे असे केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते. योग्य दिशेत झाडू ठेवल्याने सुखसमृद्धी आणि आर्थिक आवक वाढते.

 

केरसुणीचा वापर कसा करावा?-

वास्तू शास्त्रानुसार, रात्री झाडू मारणे चुकीचे आहे. कारण असे करणे माता लक्ष्मीचा अपमान समजले जाते. झाडू मारताना नेहमी लक्षात ठेवा कचरा घरातून बाहेरच्या दिशेला घेऊन जा. कचरा आतील दिशेने नेल्यास घरात नकारात्मकता येते. कचरा बाहेर ढकलल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews