Vastu Tips In Marathi:   वास्तु शास्त्रानुसार, वास्तु नियम घरातील अडचणी दूर करण्यासाठी मदत करतात. या शास्त्रानुसार घरात प्रत्येक गोष्ट वास्तु नियमांचे पालन करून केल्यास घरात नकारात्मकता येत नाही. शिवाय सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. त्यामुळे घरात नेहमीच सुखसमृद्धी राहते. वास्तु शास्त्रात प्रत्येक वस्तूबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत.

वास्तु शास्त्रानुसार घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याची एक योग्य दिशा आणि योग्य स्थान असते. त्या वस्तू त्या-त्या ठिकाणी ठेवल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. शिवाय त्यामुळे घरात सुखसमृद्धी येण्यास फायदा होतो. त्याप्रमाणेच वास्तु शास्त्रात घरात तिजोरी ठेवण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. मान्यतेनुसार, या नियमांचे पालन करून तिजोरी ठेवल्यास घरात आर्थिक अडचण येत नाही. आज आपण वास्तु शास्त्रानुसार तिजोरी ठेवण्याची योग्य दिशा स्थान याबाबत जाणून घेऊया….

 

तिजोरी ठेवण्याची योग्य दिशा-

वास्तु नियमानुसार घरातील तिजोरी नेहमी उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेत म्हणजेच ईशान्य कोणात ठेवावी. शास्त्रानुसार उत्तर दिशा धनाची देवी लक्ष्मी आणि धन देवता कुबेर यांची दिशा समजली जाते. त्यामुळे या दिशेत तिजोरी ठेवल्यास नेहमीच धन आकर्षित होते. आणि तुम्हाला कधीही आर्थिक अडचण येत नाही.

 

तिजोरी कोणत्या रंगाची असावी?

वास्तु शास्त्रानुसार दिशेसोबत रंगालाही विशेष महत्व आहे. त्यामुळेच वास्तु शास्त्रात तिजोरीच्या रंगालासुद्धा विशेष महत्व आहे. वास्तु शास्त्रानुसार तिजोरी सोनेरी रंगाची असल्यास चांगले असते. तसेच पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाची तिजोरीसुद्धा अतिशय चांगली समजली जाते. या रंगामुळे नेहमीच धन आकर्षित होते आणि तुमची तिजोरी कधीच रिकामी होत नाही.

 

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा-

धनाची देवी माता लक्ष्मी नेहमीच स्वच्छ आणि प्रसन्न ठिकाणीच वास करते. त्यामुळे तिजोरी नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवा. तिजोरीच्या जवळपास स्वच्छता ठेवा. तसेच तिजोरी चांगल्या स्थितीत असावी. तिजोरी तोडकी-मोडकी असू नये.

 

तिजोरीमध्ये ठेवू शकता ‘या’ वस्तू-

वास्तु शास्त्रानुसार, तिजोरीमध्ये पैशांसोबतच चांदीचे नाणे ठेवता येते. तसेच माता लक्ष्मीला प्रिय असणारे शंख आणि हळदीची कुडीसुद्धा तिजोरीमध्ये ठेवणे चांगले असते. असे केल्याने तिजोरी कधीच रिकामी होत नाही. तिजोरीमध्ये नेहमीच पैसे राहतात.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)