Vastu Tips In Marathi: माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते. माता लक्ष्मीची कृपादृष्टी लाभल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होऊन आर्थिक समृद्धी येते. त्यामुळे लोक नेहमीच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष प्रयत्न करत असतात. वास्तु शास्त्रामध्येसुद्धा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. त्या उपायांच्या मदतीने तुम्हाला माता लक्ष्मीची कृपादृष्टी लाभू शकते.
वास्तु शास्त्र हे अतिशय प्राचीन शास्त्र आहे. या शास्त्रानुसार घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याची योग्य दिशा आणि योग्य स्थान असते. तसेच अनेक वास्तु उपायदेखील असतात जे केल्याने घरात सुखसमृद्धी आणि नवचैतन्य येते. हिंदू धर्मात वास्तु शास्त्राला विशेष महत्व आहे. वास्तु शास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मकता येते. तसेच माता लक्ष्मीची प्रसन्न होते. आज आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी काही वास्तु उपाय जाणून घेऊया…..
घरातील वातावरण सकरात्मक ठेवा-
वास्तु शास्त्रानुसार ज्या घरातील वातावरण सकारात्मक असते त्याठिकाणी माता लक्ष्मी निवास करते. त्या घरात माता लक्ष्मीच्या कृपेने सुखसमृद्धी येते. तसेच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरातील सदस्यांमध्ये नेहमीच प्रेम आणि आपुलकी असली पाहिजे. ज्या घरात असे सकारात्मक वातावरण असते त्या घरात माता लक्ष्मी निवास करते.
घराची स्वच्छता ठेवा-
वास्तु शास्त्रानुसार, माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. त्यामुळे ज्याठिकाणी स्वच्छता आहे त्याठिकाणी लक्ष्मी निवास करते. परंतु ज्या घरात कचरा आणि अस्वच्छता असते तेथे माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे घर नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे.
घराच्या मुख्य दरवाजावर लावा शुभ चिन्हे-
वास्तु शास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजाला विशेष महत्व आहे. घराच्या मुख्य दरवाजामधूनच घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाजवळ काही चांगल्या वस्तू ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे माता लक्ष्मीची प्रसन्न होते. घरच्या मुख्य दरवाजाजवळ कळस, मासा, कमळ, शंख लावावे. तसेच दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक किंवा ओमचे चिन्ह लावावे.
कमळगट्टा माळ-
वास्तु शास्त्रानुसार, घरात कमळगट्टाची माळ ठेवू शकता. असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात धनधान्य आणि सुखसमृद्धी येते.






