Vastu Shastra Tips In Marathi: वास्तुशास्त्रामध्ये दिशेला खूप महत्व आहे. यामध्ये घरातील प्रत्येक वस्तू योग्य दिशेलाच ठेवणे आवश्यक असते. अर्थातच वास्तु शास्त्रानुसार प्रत्येक वस्तूची एक योग्य दिशा आणि स्थान असते. या वस्तू योग्य दिशेला ठेवल्याने तुम्हाला सकारात्मक प्रभाव दिसून येतात. तसेच घरातील वास्तु दोष दूर होऊन घरात सुखसमृद्धी येण्यास मदत होते.
वास्तु शास्त्रानुसार घरातील उत्तर दिशेला विशेष महत्व आहे. यानुसार घरातील उत्तर दिशेला काही वस्तू ठेवल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सुखसमृद्धी येते. घराच्या उत्तर दिशेत ठेवायच्या या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया….
धन देवता कुबेराची प्रतिमा-
वास्तु शास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेत धन देवता कुबेराचे चित्र लावल्यास घरातील आर्थिक अडचणी दूर होऊन घरात सुखसमृद्धी येते. तसेच उद्योग-व्यवसायात प्रगती होऊन फायदाच-फायदा मिळतो.
तुळशीचे रोप-
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष धार्मिक महत्व आहे. वास्तु शास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप ठेवल्यास सकारात्मक प्रभाव दिसून येतो. घरात आर्थिक सुखसमृद्धी येते.
कारंज्या-
वास्तु शास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला पाण्याचा कारंज्या ठेवणे अत्यंत चांगले असते. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरातील वातावरण प्रसन्न होते.
तिजोरी-
वास्तु शास्त्रानुसार घरातील उत्तर दिशेत तिजोरी ठेवणे अतिशय चांगले असते. असे केल्याने आर्थिक स्थैर्य निर्माण होते. तसेच पैसे आकर्षित होण्यास मदत होते. आर्थिक अडचणी दूर होऊन तिजोरीत नेहमीच पैसा राहतो.
धबधब्याचे चित्र-
वास्तु शास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेत धबधब्याचे किंवा पाणी तत्वाशी संबंधित चित्र लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील आर्थिक अडचणी दूर होऊन घरात सुखसमृद्धी येते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






