Vastu Tips to remove financial shortage at home: प्रत्येक व्यक्तीला सुखसमृद्धी आणि आर्थिक भरभराटी हवी असते. त्यामुळे लोक विविध प्रयत्न करत असतात. अनेक लोक रात्रंदिवस कष्ट करत असतात. परंतु अतोनात कष्ट करूनसुद्धा अनेकांच्या हातात पैसा राहात नाही. असे लोक कष्ट करून कमावतात परंतु तरीही त्यांच्या घरात पैसे शिल्लक राहात नाहीत. अशावेळी वास्तु दोष असण्याची शक्यता असते.
हिंदू धर्मात वास्तु शास्त्राला विशेष महत्व आहे. असे म्हटले जाते की वास्तु शास्त्रानुसार प्रत्येक कार्य केल्यास घरात सुखसमृद्धी येते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. याउलट वास्तु शास्त्राचे नियम न पाळल्यास घरात वास्तु दोष निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक कार्यात अडथळे येतात, पैशांचे नुकसान होते, आर्थिक अडचणी येतात अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळेच आज आपण पैशांचे नुकसान करणाऱ्या सवयी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया….
तुळशी ‘या’ दिशेला ठेवणे-
हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे. तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप समजले जाते. तुळशीची भक्तिभावाने पूजा केली जाते. तुळशीला दक्षिण दिशेला ठेवल्याने आर्थिक अडचणी येऊ शक्तात. त्यामुळे तुळशी नेहमीच उत्तर-पूर्व दिशेत ठेवावे.
मुख्य दरवाजाचा अपमान-
वास्तु शास्त्रानुसार मुख्य दरवाजा सुखसमृद्धीचे प्रवेशद्वार असते. त्यामुळे मुख्य दरवाजाचे अपमान केल्यास घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. त्यामुळे मुख्य दरवाजा उघडताना लात मारणे, पायाने ढकलणे असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे मुख्य दरवाजाचा अपमान करणे टाळावे.
लोटल्याशिवाय जेवणे-
वास्तु शास्त्रानुसार घरात उठल्याबरोबर साफसफाई करून घ्यावी. अनेक लोक शिळा कचरा न काढताच जेवतात. त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. म्हणूनच सकाळी उठल्यावर आधी घराची स्वच्छता करा मग जेऊन घ्या.
बेडवर एकच चादर अंथरने-
वास्तु शास्त्रानुसार अंथरून नेहमी स्वच्छ असावे. अनेकजण सतत एकच चादर अंथरून ठेवतात. परंतु असे केल्यास धनधान्यची कमतरता होते. घरात सुखसमृद्धी येत नाही.
स्वयंपाक उष्टा करणे-
वास्तु शास्त्रानुसार महिलांनी जेवण बनवताना कधीही उष्टा करू नये. असे केल्याने अन्नपूर्णा देवी नाराज होऊ शकते. त्यामुळे घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.
प्लास्टिकच्या बरणीत मीठ ठेवणे-
वास्तु शास्त्रानुसार प्लास्टिकच्या बरणीत मीठ ठेवल्याने आर्थिक टंचाई निर्माण होते. त्यामुळे मीठ नेहमीच काचेच्या बरणीत ठेवावे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





