What items should not be kept near the main door of the house: हिंदू धर्मात वास्तुशास्त्र अतिशय महत्वाचे शास्त्र समजले जाते. वास्तु शास्त्रामध्ये घरात कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेतपासून ते घरात कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात इथपर्यंत सर्व नियम आणि सल्ले देण्यात आले आहेत. मान्यतेनुसार या वास्तु नियमांचे पालन केल्यास घरात सुखसमृद्धी आणि धनधान्य येते. तसेच वास्तु नियमांचे पालन न केल्यास घरात नकारत्मक ऊर्जा निर्माण होते.
वास्तु शास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विशेष महत्व आहे. कारण घरात नकारत्मक आणि सकारात्मक ऊर्जा मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश करते. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराबाबत असलेले वास्तु नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तु शास्त्रामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कोणत्या वस्तू ठेऊ नयेत याबाबत सांगितले आहे. कारण या वस्तू ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. चला पाहूया या वस्तू कोणत्या आहेत…..
हे ही वाचा
कचरा-
वास्तु शास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचरा असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येत नाही. अशाने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ आणि नीटनेटके असल्यास घरात माता लक्ष्मी प्रवेश करते. तसेच घरातील वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न होते. त्यामुळे कधीच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचरा ठेऊ नये.
विस्कटलेले चप्पल आणि बूट-
वास्तु शास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कधीच विस्कटलेले चप्पल आणि बूट ठेऊ नयेत. घराचे प्रवेशद्वार असे विस्कळीत पाहून माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे चप्पल-बूट नेहमीच नीट आणि व्यवस्थितच ठेवावे.
उघड्यावर झाडू ठेवणे-
वास्तु शास्त्रानुसार झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे झाडू उघड्यावर मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवल्याने देवी नाराज होते. तसेच झाडूला पायाने स्पर्श केल्यानेसुद्धा माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे झाडू नेहमी घराच्या आत योग्य ठिकाणी ठेवावी.
मनी प्लांट-
वास्तु शास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मनी प्लांट ठेवू नये. असे केल्याने आर्थिक नुकसान होते. त्यामुळे घरात आर्थिक चणचण निर्माण होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)