Vasubaras 2025: 17 ऑक्टोबरला सर्वत्र वसुबारस साजरी होणार; गाईच्या पूजेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

Written by:Rohit Shinde
Published:
दिवाळीची सुरुवात गाईंच्या पूजेने म्हणजेच वसुबारसेच्या दिवशी होते. उद्या १७ ऑक्टोबरला पहिला दिवाळीचा दिवा लागणार असून उद्या वसुबारस साजरे केले जाईल.
Vasubaras 2025: 17 ऑक्टोबरला सर्वत्र वसुबारस साजरी होणार; गाईच्या पूजेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो आणि या दिवसाला विशेष धार्मिक व सामाजिक महत्व आहे. वसुबारसला “गोवत्स द्वादशी” असेही म्हणतात. या दिवशी गाई व तिच्या वासराचे पूजन केले जाते. भारतीय संस्कृतीत गाय ही ‘माता’ मानली जाते कारण ती मानवाला दूध, दही, तूप, शेण, मूत्र यांसारख्या अनेक उपयुक्त वस्तू देते. म्हणूनच वसुबारसच्या दिवशी गाय व वासराचे पूजन करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. खऱ्या अर्थाने दिवाळी सणाची सुरूवातच वसुबारसच्या दिवशी होत असते.

उद्या वसुबारस, पूजा विधी आणि मुहूर्त

दिवाळीची सुरुवात गाईंच्या पूजेने म्हणजेच वसुबारसेच्या दिवशी होते. उद्या १७ ऑक्टोबरला पहिला दिवाळीचा दिवा लागणार असून उद्या वसुबारस साजरे केले जाईल. यादिवशी गाईंची व बैलाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे. केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरात देखील गाईंच्या गोठ्यात जाऊन लोक त्यांची यादिवशी आवर्जून पूजा करतात.

वसुबारस पूजा मुहूर्त

द्वादशी तिथी प्रारंभ १७ ऑक्टोबर, सकाळी ११ वाजून १२ मिनिटांनी
द्वादशी तिथी समाप्ती १८ ऑक्टोबर, दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी
वसुबारस पूजेचा मुहूर्त : प्रदोषकाळी ४ वाजून १४ मिनिटांनी प्रारंभ ते ७ वाजून ४३ मिनिटांनी समाप्ती

वसुबारसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरातील देवांची पूजा करावी व दारात रांगोळी टाकून दिवे लावावे. यादिवशी गाय वासराची पूजा करण्याचे महत्व आहे. तसेच बैलाची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्या घरात गाई आहेत त्यांनी आपल्या गाईंची व वासराची औक्षण करून पूजा करावी.

वसुबारसच्या पूजेचे धार्मिक-सांस्कृतिक महत्व

वसुबारस हा दिवाळी सणाचा पहिला दिवस असून त्याला धार्मिक आणि सांस्कृतिक दोन्ही दृष्टिकोनातून विशेष महत्व आहे. या दिवशी गाई आणि तिच्या वासराचे पूजन केले जाते. हिंदू धर्मात गाय ही “गौमाता” म्हणून पूजनीय मानली जाते, कारण ती पोषण, समृद्धी आणि निसर्गाशी संतुलनाचे प्रतीक आहे. वसुबारसच्या दिवशी स्त्रिया कुटुंबाच्या आरोग्य, सुख आणि समाधानासाठी व्रत पाळतात. या दिवशी गायींची सेवा, गोमूत्र आणि शेणाचा गोवर्धन म्हणून उपयोग केला जातो. वसुबारस हा दिवस मानव, निसर्ग आणि प्राण्यांमधील एकात्मतेचे प्रतिक दर्शवितो आणि मातृत्वभावनेचा सन्मान करतो.

टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews