Vidur Niti : या लोकांवर असते लक्ष्मीमातेची कृपा; पहा काय सांगते विदुर नीती??

Published:
एकीकडे पांडव आणि कौरव सेनेत एकापेक्षा एक रथी महारथी असतानाही महात्मा विदुर यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.  ते त्यांच्या युद्ध कौशल्यासाठी नव्हे तर त्यांच्या ज्ञानासाठी आणि धोरणांसाठी ओळखले जातात.
Vidur Niti : या लोकांवर असते लक्ष्मीमातेची कृपा;  पहा काय सांगते विदुर नीती??

महाभारतातील विदुर तर तुम्हाला माहीतच असतील…  ज्यांना महात्मा (Vidur Niti) अशी पदवी देण्यात आली होती… विदुर म्हणजे ज्ञान , नीतिमत्ता आणि धोरणाचे प्रतीक…. एकीकडे पांडव आणि कौरव सेनेत एकापेक्षा एक रथी महारथी असतानाही महात्मा विदुर यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.  ते त्यांच्या युद्ध कौशल्यासाठी नव्हे तर त्यांच्या ज्ञानासाठी आणि धोरणांसाठी ओळखले जातात. त्यांच्या धोरणांचा संग्रह आजही विदुर नीति या नावाने प्रसिद्ध आहे. या विदुर नीती मध्ये धर्म, राजकारण आणि जीवनाशी संबंधित अशा अनेक शिकवणी आहेत, ज्या माणसाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात. विदुर नीती मध्ये लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कोणत्या लोकांना मिळतात हे सुद्धा सांगितलेलं आहे… चला तर मग आज आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊया….

1) इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा माणूस –

महात्मा विदुर यांच्या मते, ज्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले आहे आणि जो नेहमी सत्याच्या मार्गावर चालतो, अशा व्यक्तीवर लक्ष्मी मातेची विशेष आशीर्वाद राहतात. ज्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनात सुख आणि समृद्धीची कमतरता राहत नाही. त्यामुळे मनुष्याने नेहमी त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे.

2) इतरांवर दया दाखवणारा मनुष्य – Vidur Niti

जो मनुष्य इतरांवर दया दाखवतो… इतरांच्या संकटकाळात नेहमीच खंबीरपणे उभा राहतो आणि त्यांना मदत करण्यास नेहमीच तत्पर असतो अशा व्यक्तींवर लक्ष्मी माता कायमच खुश असते आणि त्याच्यावर तिचा कृपाशीर्वाद असतोच असतो… इतरांना मदत केल्याने त्या व्यक्तीला समाजातही मानसन्मान मिळतो त्यामुळे मनुष्याने नेहमी इतरांवर दया करावी म्हणजेच लक्ष्मी माताही तुम्हाला आशीर्वाद देईल आणि समाजात मानसन्मानही मिळेल असे विदूर नीती मध्ये म्हटलं आहे. Vidur Niti

या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा

महात्मा विदुर यांनी त्यांच्या धोरणात सांगितले आहे की व्यक्तीने पैशाचे योग्य व्यवस्थापन करण्याची बचत करण्याची सवय अंगी बाळगायला हवी…. विनाकारण कोणत्याही गोष्टींवर वारेमाप पैसा खर्च करू नये…  वायफळ पैसा खर्च केल्यास लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होऊ शकते आणि तुम्ही लवकरच कंगाल होण्याची शक्यता असते…. याउलट जर तुम्ही पैशांची योग्य बचत केली तर भविष्यात पैशाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत नाही.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)