दरवर्षी सूर्यदेवाच्या कन्या राशीत संक्रमणाच्या दिवशी विश्वकर्मा जयंती (Vishwakarma Puja 2025) साजरी केली जाते. हिंदू धर्मात, कारागीर आणि व्यावसायिकांसाठी भगवान विश्वकर्माच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. बिहार, बंगाल आणि झारखंडसह देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. असे म्हटले जाते की, भगवान विश्वकर्माची पूजा केल्याने व्यक्तीमध्ये कामात कार्यक्षमता येते. व्यक्तीच्या जीवनात समृद्धी येते…. कष्टाचे चीज होऊन पैसे कमावण्याच्या दिशेने योग्य पाऊल पडते…..
.

कधी आहे विश्वकर्मा पूजा ? Vishwakarma Puja 2025

यावर्षी विश्वकर्मा पूजा १७ सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी यंत्रसामग्री, अवजारे, खातेवही आणि कंप्युटर यांची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी, भगवान विश्वकर्माचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी काही उपाय केले जातातm  हे उपाय केल्याने, विश्वकर्माजींच्या आशीर्वादाने, व्यवसायात मोठी भरभराट होते आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते असं म्हटलं जात. Vishwakarma Puja 2025

विश्वकर्मा जयंती २०२५ उपाय

हळदीच्या गाठीचा वापर

या दिवशी, पूजेत विश्वकर्माजींना हळदीची गाठ अर्पण करा आणि ती तुमच्या कारखान्यात किंवा कार्यालयात सुरक्षित ठेवा. असे केल्याने पैशाची भरभराट होते.

पिवळे कपडे

पूजेदरम्यान पिवळे कपडे घाला आणि कपाळावर हळदीचा टिळक लावा. संध्याकाळी लक्ष्मी- नारायण मंदिरात ७ हळदीच्या गाठी अर्पण करा. असे मानले जाते की यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात.

नारळ फुले अर्पण करा

विश्वकर्मा पूजा केल्यानंतर, भगवान विश्वकर्मांना हळद, नारळ, फुले आणि कुंकू अर्पण करा. यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि व्यवसाय वाढीस मदत होते असं म्हटलं जात.

ऑफिस मध्ये पूजा-

विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी तुमचे दुकान, कंपनी किंवा कार्यालय स्वच्छ करा. यंत्रसामग्री, अवजारे, संगणकांची योग्य प्रकारे पूजा करा. विश्वकर्माजींना पिवळी फुले आणि चंदन अर्पण करा. यामुळे उत्पादकता वाढते.

मंत्राचा जप करा-

पूजेदरम्यान, “ओम विश्वकर्मा देवाय नमः” मंत्राचा किमान 108 वेळा जप करा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)