Vastu Shastra Tips In Marathi: हिंदू धर्मानुसार ज्या घरात वास्तु शास्त्राचे नियम पाळले जातात त्याठिकाणी नेहमीच सुखसमृद्धी असते. वास्तु शास्त्राचे नियम पाळल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. शिवाय घरात सुखसमृद्धी येते. परंतु वास्तु शास्त्राचे नियम न पाळल्याने घरात अनेक समस्या निर्माण होतात. अशा लोकांना अनेकदा वास्तु दोषाचा सामना करावा लागतो. त्यामुळेच अनेकजण वास्तु नियम फॉलो करतात.
वास्तु शास्त्रानुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या घरात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुखसमृद्धीसुद्धा येते. त्यामुळे अनेकजण या वस्तू घरात ठेवतात. यामध्ये कासवाच्या मूर्तीचासुद्धा समावेश होतो. कासवाची मूर्ती घरात ठेवणे अत्यंत चांगले समजले जाते. आज आपण कासवाची मूर्ती घरात ठेवण्याचे फायदे आणि त्याची योग्य दिशा आणि स्थान जाणून घेऊया….
कासवाची मूर्ती घरी ठेवण्याचे फायदे?
वास्तु शास्त्रानुसार घरात कासवाची मूर्ती ठेवणे अत्यंत चांगले असते. कासव घरी ठेवल्याने घरात सुखसमृद्धी आणि सौभाग्य येते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत मिळते. तसेच विविध वास्तु दोष दूर होण्यास मदत होते.
घरी कासवाची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा-
वास्तु शास्त्रानुसार घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याची एक योग्य दिशा आणि स्थान असते. त्या नियमांचे पालन केल्यास त्याचा योग्य फायदा मिळण्यास मदत होते. चुकीच्या दिशेत ठेवल्याने त्याचा हवा तसा फायदा मिळत नाही. यानुसार कासवाची मूर्ती घरातील उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवणे अत्यंत चांगले असते. तसेच मूर्ती चांदी, सोने किंवा पितळेची मूर्ती असेल तर ती या दिशेला ठेवावी. पण जर मूर्ती क्रिस्टलची असेल तर ती ईशान्य कोन्याला किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवणे चांगले असते.
घरी कासवाची मूर्ती ठेवण्याचे योग्य स्थान-
वास्तु शास्त्रानुसार घरात सुखसमृद्धी येण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यासाठी कासवाची मूर्ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवावी. असे केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तसेच मुलांच्या खोलीत ही मूर्ती ठेवल्याने त्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





